शहर या संकल्पनेची व्याख्या लिहून जनगणना शहर ठरविण्याचे तीन निकष सविस्तर कसे स्पष्ट कराल?www.marathihelp.com

शहर कशाला म्हणावे?
शहर हा शब्द मुळचा अरबी भाषेतला आहे. शहरे म्हणजे नागरी वसाहत होय. तसेच शहरामध्ये मानवाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा उपलब्ध असतात. शहरात नोकरीच्या संधीही उपलब्ध असतात. शहरात ज्याप्रमाणे सर्व सोयीसुविधा यांचे फायदे आहेत त्याचप्रमाणे त्यांचे तोटेही आहेत, जसे की, शहरात वेगवेगळ्या प्रकाराचे प्रदूषण होत असते.

भारतात शहरांचे मुख्य दोन मुख्य प्रकार मान्य आहेत.

पहिला प्रकार म्हणजे, अशी सर्व स्थाने जेथे नगरपालिका, महापालिका, कँटॉनमेंट बोर्ड किंवा अनुसूचित टाऊन एरिआ कमिटी वगैरे म्हणून निर्देशित आहेत.

दुसरे म्हणजे, (१) ज्या स्थानांची किमान लोकसंख्या ५००० असते, (२) जेथे किमान ७५% प्रौढ पुरुष शेतीशिवाय दुसऱ्या उद्योगात कार्यरत असतात, आणि (३) जेथे लोकसंख्येची घनता किमान ४०० व्यक्ती प्रती चौरस किलोमीटर असते अशी सर्व स्थाने शहर मानली जातात.

पहिल्या प्रकारातील शहरे 'घटनात्मक शहरे' म्हणून ओळखली जातात. तशा प्रकारचे कायदेशीर निर्देश ती ती राज्य सरकारे किवा केंद्रशासित प्रदेश यांनी जाहीर केलेले असतात. त्या निर्देशाप्रमाणे महापालिका, नगरपालिका वगैरे सुयोग्य संस्था गठीत करण्यात आलेल्या असतात.

दुसऱ्या प्रकारच्या शहरांना 'जनगणना शहरे' असे म्हणतात.

१००००० पेक्षा जास्त लोकसंख्या असेल तर ती सीटी (city) म्हणून ओळखली जाते आणि १००००० पेक्षा कमी लोकसंख्या असल्यास ती टाऊन (town) म्हणून ओळखली जातात.

शहर संचय (Urban Agglomeration)

(१) टाऊन अधिक त्याच्या आजूबाजूला झालेली वाढ, किंवा (२) अनेक टाऊन एकमेकांना लागून तयार झालेला शहर संचय आणि (३) अनेक टाऊन एकमेकांना लागून असताना कधी त्यांच्या आजूबाजूला वाढ असेल, तर कधी नसेल असेही प्रकार. अशा विविध पद्धतींनी शहर संचय तयार होऊ शकतो. मात्र शहर संचयात किमान एक तरी 'घटनात्मक शहर' असणे आवश्यक असते.

आजूबाजूची शहरी वाढ (Outgrowth OG)

शहराला खेटून असलेले रेल्वे कॉलनी, विद्यापीठ, पोर्ट, मिलिटरी कँप वगैरे. आउट ग्रोथ (OG) चा विषय यासाठी महत्त्वाचा असतो की शहराला त्याना रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज, शिक्षण, पोस्ट, वैद्यकीय सोयी, बँका वगैरे सोयीसुविधा पुरवाव्या लागतात.

टाऊन आणि आजूबाजूची शहरी वाढ याला 'एकत्रित शहर विभाग' (integrated urban area) म्हणून कल्पावे लागते. शहर संचय (Urban Agglomeration) म्हणून त्याचे एकत्रित नियोजन करावे लागते.

या सर्व विवेचनावरून दिसून येते की 'शहर' ही संकल्पना कशी अनेक पदरी आणि गुंतागुंतीची आहे. त्याचे धागेदोरे अनेक दिशांनी कसे जातात आणि स्थलकालानुरूप बदलत देखील जातात ते समजून घेतले पाहिजे.

शहरांचे वर्गीकरण

वर्ग १: १००००० किंवा जास्त लोकसंख्या (यांना सीटी संबोधतात ते वर आलेच. बाकी सर्व टाऊन.)

वर्ग २: ५०००० ते ९९९९९

वर्ग ३: २०००० ते ४९९९९

वर्ग ४: १०००० ते १९९९९

वर्ग ५: ५००० ते ९९९९

रिझर्व बँकचे वर्गीकरण

रिझर्व बँक ने टीअर पद्धती वापरली आहे. त्याप्रमाणे महानगरे टीअर१ सेंटर, टीअर२,३,४ सेमी अर्बन सेंटर, टीअर५,६ रुरल सेंटर मध्ये मोडतात.

शहर संचय (Urban Agglomeration) चे वर्गीकरण

१० लाखांपेक्षा मोठे शहर संचय (Urban Agglomeration):

मेट्रो सीटी: ४० लाख किंवा जास्त

मेगा सिटी: १ कोटी किंवा अधिक.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 14:18 ( 1 year ago) 5 Answer 4129 +22