जगात किती महायुद्ध झाले?www.marathihelp.com

जगात किती महायुद्ध झाले?

जगामध्ये २ महायुद्ध झाले.

पहिले महायुद्ध, पहिले महायुद्ध, ग्रेट वॉर, किंवा वॉर टू ॲन्ड ऑल वॉर्स या नावानेही ओळखले जाते. हे युद्ध २८ जुलै१९१४ पासून ११ नोव्हेंबर १९१८ पर्यंत चालले. इतिहासातील सर्वात मोठ्या युद्धांपैकी एक अश्या या युद्धात ७ कोटी सैनिकांनी भाग घेतला ज्यापैकी ६ कोटी सैनिक युरोपियन होते. भांडखोर देशांची तांत्रिक आणि औद्योगिक प्रगती आणि प्रदीर्घ खंदक लढायांतून निर्माण झालेली 'जैसे थे' परिस्थिति यामुळे या युद्धात आणि त्याबरोबर झालेल्या विविध शिरकाणांमध्ये ९ लाखांपेक्षा जास्त सैनिक व ७ लाख नागरिक ठार झाले. हा इतिहासातील सर्वात घातक संघर्षांपैकी एक होता, आणि त्यात सामील असलेल्या अनेक देशांमध्ये क्रांती किवा मोठ्या राजकीय बदलांसाठी कारणीभूत झाला. युद्धापूर्वीच्या सुप्त संघर्षांचे पूर्ण निराकरण न झाल्याने या युद्धाअखेरीस एकवीस वर्षांनंतर झालेल्या दुसऱ्या महायुद्धाची बीजे रोवली गेली.

दोस्त राष्ट्रे किंवा ट्रिपल ऑंतॉंत (रशियन साम्राज्य, फ्रेंच तिसरे प्रजासत्ताक आणि ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र) आणि केन्द्रीय सत्ता (जर्मनी आणि ऑस्ट्रिया-हंगेरी) या दोन गटात झालेल्या या युद्धात जगातील सर्व आर्थिक महासत्ता ओढल्या गेल्या. जरी इटली हा जर्मनी आणि ऑस्ट्रिया-हंगेरी यांच्याबरोबर तिहेरी युतीचा सदस्य असला तरी, ऑस्ट्रिया-हंगेरीने युतीच्या अटींविरुद्ध जाऊन आक्रमण केल्यामुळे त्याने केन्द्रीय सत्तांच्या बाजूने युद्धात भाग घेतला नाही. जसजसे अधिकाधिक देश या युद्धात सामील झाले तसतशी युद्धपूर्व आघाड्यांची वाढ आणि पुनर्रचना झाली. इटली, जपान आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने दोस्त राष्ट्रांत सामील झाले, तर ओस्मानी साम्राज्य आणि बल्गेरिया केन्द्रीय सत्तांमध्ये सामील झाले.



दुसरे महायुद्ध हे १९३९ ते १९४५ दरम्यान झालेले जागतिक युद्ध होते. हे युद्ध मुख्यतः युरोप व आशियामध्ये दोस्त राष्ट्रे व अक्ष राष्ट्रे यांच्या मध्ये झाले. जर्मनीने पोलंडवर केलेल्या हल्ल्याने हे युद्ध १ सप्टेंबर १९३९ रोजी अधिकृतपणे सुरू झाले.[१][२] यानंतर फ्रान्स, युनायटेड किंग्डम आणि इतर राष्ट्रांनी जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. जपानने व इटलीने जर्मनीच्या बाजूने युद्धात पदार्पण केले. १९४१ च्या डिसेंबरमध्ये जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर बंदरावर आक्रमण केल्यामुळे अमेरिकेला युद्धात उतरणे भाग पाडले. अमेरिकेने युद्धात सक्रिय भाग घेतला व तेथून युद्ध जगभर पसरले. दोस्त राष्ट्रांमध्ये चीन, रशिया, इंग्लंड, अमेरिका व इतर राष्ट्रांचा समावेश होता, तर अक्ष राष्ट्रांमध्ये जर्मनी, इटली व जपान हे देश होते. जवळ जवळ ७० देशांचे सैन्य यात सहभागी झाले होते. या युद्धात सहा कोटींच्यावर माणसे मेली. मानवी इतिहासातील ही सर्वांत मोठी जीवितहानी आहे. या युद्धामध्ये दोस्त राष्ट्रांचा विजय झाला.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 13:08 ( 1 year ago) 5 Answer 6179 +22