इंग्रज भारतामध्ये कधी आले?www.marathihelp.com

24 ऑगस्ट 1608 ला इंग्रज भारतामध्ये सर्वप्रथम आले…ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी मध्ये मसाल्यांचे व्यापारी म्हणून भारतात आली, पूर्वी युरोपमधील एक अतिशय महत्त्वाची वस्तू कारण ती मांस टिकवण्यासाठी वापरली जात होती. त्याशिवाय, ते प्रामुख्याने रेशीम, कापूस, नील रंग, चहा आणि अफू यांचा व्यापार करत. ते भारतीय उपखंडात २४ ऑगस्ट १६०८ रोजी सुरत बंदरावर आले…

थाॅमस स्टीव्हन (जन्म १५४९-मृत्यू १६१९ ) हा इंग्रज , (विल्टशायर, इंग्लंड) येथील ब्रिटीश रहिवासी. त्याने वडिलांना लिहिलेले पत्र (रिचर्ड हक्लुइट ) कागदोपत्री उल्लेख आढळतो , तो १५७९ ऑक्टोबर चा शेवटचा आठवडा किवा नोव्हेंबर सुरवातीस गोवा येथे पोर्तुगाल-लिस्बन येथून जहाजाने गोवा (कोकण) भारतात आला .त्याने कोकणी ,मराठी भाषिकांसोबत संवाद साधला. त्याने आपल्या डायरीत वर्णने नमूद करून ठेवली. त्याच बेसिस वर ,पायावर, ईस्ट इंडिया कंपनीला भारताबद्दल माहिती मिळाली .आणि ईस्ट इंडिया कंपनी चा भारतात येण्याचा मार्ग प्रशस्त झाला. (ईस्ट इंडिया कंपनी ,स्थापना लंडन ,डिसेंबर. १६००, सदस्य ५ ते ६ जण)

भारतात फ्रेंच .पोर्तुगीझ ,आले त्यावेळी त्यांच्यासोबत कोणी इंग्रज हि असतील परंतु त्यांची नावे मिळू शकत नाही. पोर्तुगीज वास्को द गामा , (१४९७) भारतात येवून गेला होता आणि त्याने युरोपियनांना .आता आपल्याला भारतात जाण्याचा खुष्कीचा मार्ग अवगत झाला. ह्याचे ज्ञान पोर्तुगीज तसेच युरोपियनांना करून दिले , त्यावेळीपासून ,हौशी दर्यावर्दी ,चाचे ,खलाशि जहाजांचे शिडावर भारतात व्यापारी असल्याचा बनाव करून भारतातील समुद्र बंदरात येऊ‌ लागले. भारतीय स्थानिक राजे , राजानां ,युरोपियन वस्तु चे प्रलोभन ,आमिष ,वर्णन करु लागले.

solved 5
General Knowledge Monday 24th Oct 2022 : 08:44 ( 1 year ago) 5 Answer 2404 +22