७५ वर्षाला काय म्हणतात?www.marathihelp.com

अमृत महोत्सव (Platinum jubilee - प्लॅटीनम जुबली) म्हणजे ७५ वा वर्धापन दिन होय. याला अमृत जयंती किंवा पंताहत्तरावी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्यास अमृत महोत्सव साजरा केला जातो. उदा, एखाद्या संस्थेच्या स्थापनेस ७५ वर्ष पूर्ण झाल्यास अमृत महोत्सव साजरा करतात. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि भारताने २०२२ मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे.

अमृत महोत्सवी वर्ष हे ७४ व्या वर्धापन दिनापासून ते ७५ व्या वर्धापन दिनापर्यंत साजरे केले जाते.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव किंवा भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन किंवा आझादी का अमृत महोत्सव हा एक आगामी कार्यक्रम आहे, ज्यामध्ये १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारताच्या स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा केला.

solved 5
General Knowledge Monday 10th Oct 2022 : 16:58 ( 1 year ago) 5 Answer 158 +22