हवा प्रदूषण कायदा कधी अस्तित्वात आला?www.marathihelp.com

हवा प्रदूषण कायदा कधी अस्तित्वात आला?

१९८३ मध्ये महाराष्ट्रात हवा (पी आणि सीपी) कायदा,१९८१ लागू करण्यात आला आणि सुरुवातीला काही भागांना वायू प्रदूषण नियंत्रण क्षेत्र म्हणून ०२/०५/१९८३ रोजी घोषित केले गेले. ०६/११/१९९६ पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्य वायू प्रदूषण नियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित केले गेले.



हवेतील महत्त्वाचे घटक
नायट्रोजन

नायट्रोजन हा हवेतील मुख्य घटक आहे. तो निसर्गात मोठ्या प्रमाणावर मुक्त स्थितीत आढळतो. नायट्रोजन हा रंगहीन वायू असून त्याला वास व चव नसते. तो विषारी नाही. तो पाण्यात अल्प प्रमाणात विरघळतो. नायट्रोजन वायू विषारी नसला तरी अधिक दाबाखाली, माणसाच्या शरीरात गेल्यास वेड्यासारख हसू लागतो. व त्यांच्या १०% वातावरणीय दाबाने बेशुध्दी आणि मृत्यू संभोवतो.

विजा चमकत असताना, वातावरणातील नायट्रोजन आणि ऑक्सिजीन यांचा संयोग होऊन नायट्नीक ऑक्साईड ( छज २ ) तयार होतो. नायट्रोजन डायऑक्साईड पावसाच्या पाण्यात विरघळून नायट्न्स ऑक्साइड ि कछज३ र्े आणि नायट्नीक अॅसिड तयार होतात. ती अत्यंत विरल स्वरूपात पावसाबरोबर जमिनीवर आणली जातात. त्यांची जमिनीवर आम्ल धर्मी पदार्थांशी अभिक्रीया होते आणि शेवटी नायट्रेट क्षार तयार होतात. त्याचा वनस्पतींच्या वाढीसाठी उपयोग होतो. वनस्पतिज अन्नातून प्राण्यांना नायट्रोजन मिळतो.

स्थिरीकरण झालेल्या नायट्रोजन, संयुगांच्या विघटनामुळे पुन्हा हवेत सोडला जातो. हे कार्य विनायट्नीकरण जिवाणू घडवून आणतात. जमिनीतील नायट्रोजन युक्त पदा यांचे हे जिवाणू विघटन करतात आणि मुक्त नायट्रोजन हवेत मिसळला जातो. तसेच लाकूड, वनस्पती व प्राण्यांचे अवशेष हवेत जळले असता त्यातील नायट्रोजन मुक्त होऊन हवेत मिसळतो. अशा प्रकारे निसर्गामध्ये नायट्रोजनचे चक्र अव्याहत चालू असते.
प्राण वायू

प्राण वायू हा हवेतील महत्त्वाचा घटक आहे. प्राणवायू विना माणूस पाच मिनीटे देखील जगणे शक्य नाही. हवेत ऑक्सिजनचे प्रमाण २१% असते. ते १०% कमी झाल्यास लगेच मृत्यू ओढवतो. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सर्वप्रथम मेंदूवर आघात होतो. या मुळे गोंधळलेली अवस्था गुंगी येणे, मृत्यू येणे असे प्रकार घडतात. विषारी अथवा अविषारी वायू केवळ आपल्या आस्तित्वाने हवेतील ऑक्सिजन कमी करतात.
कार्बनडाय ऑक्साईड

हवेत कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण ०.०३% इतके असते. कार्बन आणि त्याच्या संयुगांच्या जळण्याने कार्बन डाय ऑक्साईड निर्माण होतो. हा वायू हवेपेक्षा जड आहे.

वनस्पती, माणूस व इतर सर्व प्राण्यांच्या श्वसनाच्या क्रियेत कार्बनडाय ऑक्साईड मुक्त होतो, माणूस एका दिवसात साधारण ४०० लिटर कार्बन डायऑक्साईड उच्छ्वासावाटे बाहेर टाकतो. लाकूड, कोळसा, तेल आणि गॅस इ. प्रकारच्या इंधनांच्या ज्वलनात दर वर्षाला ३० अब्ज टनांपेक्षा अधिक कार्बनडायऑक्साईड वातावरणात विलीन होतो.

कार्बनडायऑक्साईड हा वनस्पतींच्या पोषणातला मुलाधार आहे. निसर्गामध्ये ज्वालामुखींच्या उद्रेकामुळे कोट्यावधी टन कार्बनडायऑक्साईड बाहेर टाकला जातो. कार्बनडायऑक्साईडच्या वाढत्या प्रमाणामुळे वातावरणातील उर्जेचा समतोल ढळतो व भुपृष्ठावरील असलेल्या वातावरणाचे तपमान वाढते. वातावरणातील तपमानामुळे हवामान व पाऊस यांच्यामध्ये बदल होतो.





हवा प्रदूषण

१) प्रदूषणास चार घटक जबाबदार आहेत.
२) चालू नैसर्गिक स्थिती.
३) मानवी लोकवस्ती.
४) उत्पादनाची आणि खपाची पातळी.
५) तंत्रज्ञानाचा उपयोग.

solved 5
पर्यावरण Tuesday 6th Dec 2022 : 11:50 ( 1 year ago) 5 Answer 4925 +22