स्थूल अर्थशास्त्र चा उगम कधी झाला?www.marathihelp.com

सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र या शब्दांचा सर्वप्रथम वापर 1933 मध्ये ऑस्लो विद्यापीठातील नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फ्रिश यांनी केला.

स्थूल अर्थशास्त्राला इंग्रजीत Makro Economics असे म्हणतात Makro शब्दापासून Macro हा इंग्रजीत प्रति शब्द तयार झाला त्याला मराठीत स्थूल / समग्र असे म्हणतात . या स्थूल अर्थशास्त्रात एकूण अर्थव्यवस्थेचा विचार केला जातो . म्हणजेच अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकांचा अभ्यास न करता सर्व घटकांचा एकत्रित अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो . स्थूल अर्थशास्त्राचा संबंध अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी , एकूण पुरवठा , एकूण राष्ट्रीय उत्पन्न , एकूण बचत , एकूण गुंतवणूक , एकूण उत्पादन , एकूण उपभोग इत्यादीशी येतो . अर्थव्यवस्थेतील एका विशिष्ट कारखान्यातील कामगारांच्या वेतनाची चर्चा विशिष्ट बचती ऐवजी एकूण बचतीचा विचार विशिष्ट उत्पादना ऐवजी एकूण उत्पादनाचा विचार आपण स्थूल अर्थशास्त्रात करतो . थोडक्यात स्थूल अर्थशास्त्र राष्ट्राला उपयुक्त ठरते . अशा तत्वांची व धोरणाची चर्चा करते . 



स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्या :- [ Definition of macro economics ] 
अनेक अर्थशास्त्रज्ञांनी स्थूल अर्थशास्त्रांच्या व्याख्या दिल्या आहेत . त्यातील काही व्याख्या पुढीलप्रमाणे :-

1] प्रा . जे . एल . हॅन्सेन :- 
" एकूण रोजगार , एकूण बचत , एकूण भांडवल गुंतवणूक आणि राष्ट्रीय उत्पन्न या सारख्या मोठया समुच्चयातील संबंधाचा विचार करणारी अर्थशास्त्रांची शाखा म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय " .

2] प्रा . कार्ल शॅपिरो :-
" स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे " .

स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती :- [ scope of Macro economics ]
समग्रलक्षी अध्ययन पद्धती ज्या दृष्टीकोनातून उपयोगाची ठरते . आणि ज्या बाबीसाठी अशा अध्ययन पद्धतीचा वापार होतो . त्यावरून समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती लक्षात येते .

1] रोजगार व उत्पादन सिद्धांत :- [ Employment & production theory ] 
लॉर्ड केन्स यांनी रोजगार व उत्पादना संदर्भात जो सिद्धांत मांडला तेव्हा पासून रोजगार व उत्पादन पातळी योग्य समतोल ठेवण्यासाठी कोणते प्रयन्त केले पाहिजे याचे मार्गदर्शन केले त्याच प्रमाणे प्रा .लिप्से यांनी अर्थव्यवस्थेतील साधन संपत्तीची स्थिती लक्षात घेऊन साधन संपत्ती बेकार राहणार नाही . अशा प्रकारे त्याचा वापर केला पाहिजे तेव्हा उत्पादन व रोजगाराची व्याप्ती साध्य करता येते थोडक्यात समग्र अर्थशास्त्राच्या माध्यमातून रोजगार पातळी अशी गाठली जाते . या विषयी लिप्से यांनी मार्गदर्शन केले आहे . 

2] उपभोग व गुंतवणूक सिद्धांत :- [consumption & investment theory ]
अर्थव्यवस्थेत व्यक्ती , संस्था व सरकार उपभोग वस्तू व भांडवली वस्तू यावर खर्च करीत असतात . भविष्यकालीन उपभोग तरतूद वर्तमानकालीन गुंतवणूकीतून केली जात असते . थोडक्यात उपभोगाची आणि गुंतवणूकीची पातळी व्यक्ती , संस्था , सरकार व विदेशी नागरीक यांच्या परस्पर संबंधावर आधारित असते . शक्यतो देशपातळीवर उपभोगाची व गुंतवणूकीची पातळी अपेक्षेप्रमाणे प्रस्थापित झाली पाहिजे अशा आर्थिक विश्लेषणाचा उद्देश असतो . त्यातुनच उपभोग व गुंतवणूक सिद्धांत आकारास आले आहे . 

3] व्यापार चक्रविषयक सिद्धांत :- [ Theory of business cycles ] 
व्यापार चक्रां संदर्भात खऱ्या अर्थाने 1929 च्या मंदीनंतर कमालीची जागृता आली . श्यूंपिटर यांनी व्यापारचक्र संदर्भात विशेष अभ्यास करून व्यापार चक्र विरोधी उपाययोजना येतील या संदर्भात मार्गदर्शन केले आहे . व्यापार चक्रीय व्यापकता आकार कसा मर्यादित करता येईल . याचे मार्गदर्शन केले आहे . जगातील अर्थव्यवस्थेमध्ये . व्यापार चक्रीय बदल होत असतात . तेजी , घसरण , मंदी , पुनर्जीवन या अवस्था व त्यांचे परिणाम या विषयी व्यापार चक्र सिद्धांत स्पष्टीकरण करतो .

4] सर्व सामान्य किंमत पातळी सिद्धांत :- [ All Common Price level theory ]
प्रत्येक देशात सर्व सामान्य किंमत पातळी कशी प्रस्थापित होते . तिच्यातील चढ - उताराचे काय परिणाम होतात . चलनवाढ व चलन संकोच या स्थितीचे काय परिणाम होतात. ते परिणाम कसे दुर करावे . या संदर्भात सिद्धांतात विचार केला आहे . 

5] आर्थिक अभिवृद्धी :- [ Economic growth ]
प्रत्येक अर्थव्यवस्थेचा भविष्य उज्वल असावा या विषयी प्रयत्न करत असते . भविष्यकाळात उत्पादन , रोजगार , निर्यात , उच्च राहणीमान , उच्च बौद्धीक सुख या विषयी मार्गदर्शन करीत असते यातूनच आर्थिक वृद्धीचे उद्दीष्ट्ये साध्य होते . विकसनशील व गरीब राष्ट्र आपल्या समस्या कशा सोडवू शकतील या विषयी अनेक अर्थशास्त्रज्ञांनी आपली प्रतिमाने सादर करून विश्लेषन केलेले आहे . थोडक्यात आर्थिक वृद्धी विषयी गरिब व श्रीमंत राष्ट्र अधिक सतर्क आहे . 

6] विभाजनाचा सिद्धांत :- [ The Principle of division ] 
प्रत्येक देशांत राष्ट्रीय उत्पन्नाची वाटणी कशी होती . उत्पन्न वाटणीत फेरबदल कसे होतात . देशातील दारिद्रय निर्मुलन कसे करावे . मागास जातीचा विकास कसा करावा. कराच्या माध्यमातून मिळालेला पैसा सार्वजनिक खर्चाच्या माध्यमातून कसा वापरावा. कराच्या बाबतीत न्याय दृष्टीकोन कसा असावा. या संदर्भात अनेक अर्थतज्ञांनी मार्गदर्शन केले आहे . थोडक्यात समग्र अर्थव्यवस्था काही उद्दीष्ट्ये समोर ठेवून या शब्दाचा कसा उपयोग करता येईल. यावरून समग्र अर्थशास्त्राची व्याप्ती लक्षात येते .

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 10:09 ( 1 year ago) 5 Answer 4613 +22