सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय?www.marathihelp.com

सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय?

अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी अर्थज्ञांनी अर्थशास्त्राचे दोन भागात वर्गीकरण केलेले आहे . ते म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र व समग्रलक्षी (स्थूल) अर्थशास्त्र होय . 
अर्थशास्त्रातील विविध अर्थ घटकांच्या सुक्ष्म पध्दतीने अभ्यास करण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र नेहमी उपयोगी पडते .
सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला अंशलक्षी अर्थशास्त्र , व्यष्ठी अर्थशास्त्र किंवा सूक्ष्म आर्थिक विश्लेषन अशा अनेक नावाने संबोधले जाते . सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्रजी Micro Economics असे म्हणतात Micro हा शब्दा Mikros या ग्रीक शब्दापासुन तयार झालेला आहे . Mikros याला मराठी भाषेत लहानात - लहान भाग असे म्हणतात या वरून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अर्थज्ञांनी पुढील प्रमाणे व्याख्या केल्या आहे . 


सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्या : [ Definition of Micro Economics ]

1 ] मॉरिस डॉब :  " या अर्थशास्त्रज्ञांच्या मते अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मपणे अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय ."

2 ] के . ई . बोल्डीग : " याच्या मते विशिष्ट उत्पादन संस्था , विशिष्ट कुटुंब , विशिष्ट किंमत , विशिष्ट वस्तु , विशिष्ट उदयोग इत्यादीचे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय . "

3 ] प्रा लर्नर : " अर्थव्यवस्थेत व्यक्ती व उदयोग संस्था हे उपभोक्त्याचे आणि उत्पादकांची भुमिका कशी पार पाडतात याचे सूक्ष्म पध्दतीने अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय ."
वरील व्याख्यावरून असे स्पष्ट होते की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा संबंध अर्थव्यवस्थेतील आर्थिक घटकांच्या लहानात लहान भागाच्या अभ्यासांशी असतो . उदा . एक व्यक्ती , एक कुटुंब , एक उत्पादन संस्था इ. घटनाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो . 

सूक्ष्म अर्थशास्त्रारांची व्याप्ती : [ Scope of Micro Economics ]

सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विविध आर्थिक घटकांचा सूक्ष्म पध्दतीने अभ्यास केला जातो . म्हणून त्याला सूक्ष्म आर्थिक विश्लेषन असे म्हणतात . सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र ही संकल्पना व्यापक स्वरूपाची असुन या संकल्पने मध्ये अर्थशास्त्रातील विविध घटकांचा अभ्यास केला जातो . पुढील तक्तांवरून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती व अभ्यास विषय स्पष्ट करता येतो .


सुक्ष्म अर्थशास्त्रारांची व्याप्ती

1] वस्तूची किंमत निश्चिती : [Commodity pricing]
सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात वस्तू आणि सेवा यांच्या किंमत निश्चितीच्या संबंधात अभ्यास केला जातो . ज्या मध्ये उपभोक्त्याकडून (ग्राहक) होणारी मागणी व उत्पादकाकडून (दुकानदार) होणारा पुरवठा यांचा विचार केला जातो . उपभोक्त्याचा बाजुने मागणीचा सिद्धांत तर उत्पादकाचा बाजुने उत्पादन व खर्च विषयक सिध्दांत सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अभ्यासले जातात .

2] घटकांची किंमत निश्चिती : [Price determination of components]
उत्पादनाचा प्रक्रियेत भुमी , श्रम , भांडवल आणि संयोजक हे चार घटक महत्वाचे असतात या चार घटकांचा वापराबाबत त्यांना आर्थिक मोबदले निश्चित करण्यासंबंधीचे विविध सिध्दांत आहे . उदा . खंड विषय सिध्दांत , वेतनविषयक सिध्दांत आणि बाजाराचे सिध्दांत सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात मांडले जाते .

3] आर्थिक कल्याण : [Financial welfare] 
सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा आर्थिक कल्याण हा महत्त्वाचा विषय मानला जातो . कारण आर्थिक कल्याण हे व्यक्तीगत कल्याण व सामाजिक कल्याण यावर अवलंबुन असते अर्थव्यवस्थेचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे समाजाचे हित आहे . म्हणूनच आर्थिक कल्याण संदर्भात असणारे विविध सिध्दांत सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अभ्यासले जातात .

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 10:06 ( 1 year ago) 5 Answer 4608 +22