सिबिल स्कोर किती पाहिजे?www.marathihelp.com

सिबिल स्कोर म्हणजे काय?

ट्रान्सयूनियन सिबिल लिमिटेड भारताची पहिली वहिली क्रेडीटची माहिती पुरवणारी कंपनी आहे, जिला क्रेडीट ब्युरो सुद्धा म्हटले जाते. ही कंपनी ग्राहकांविषयी अशी माहिती उपलब्ध करून देते, ज्या माहितीच्या आधारे आर्थिक कंपन्याच्या वापरामध्ये वाढ होते आणि ग्राहकांना कमी अटींमध्ये कर्ज मिळते.

या कंपनीकडे जवळपास २४०० पेक्षा जास्त सदस्य आहेत. ज्यामध्ये मोठमोठ्या बँका, आर्थिक कंपन्या, नॉन बँकिंग कंपन्या आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्यांचा समावेश आहे. तसेच या कंपनीकडे ५५० दशलक्ष पेक्षा जास्त लोकांचे आणि आर्थिक संस्थांचे क्रेडीट रेकॉर्ड आहेत.

 

सिबिल स्कोर निश्चित कसा केला जातो?

जो व्यक्ती कर्ज घेण्यास इच्छुक आहे, त्याच्या गेल्या सहा महिन्यांचा रेकॉर्ड बघितला जातो आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीच्या माहितीचा आढावा घेतला जातो. त्याच्या नंतर त्याने पूर्वीचे कर्ज वेळेवर फेडले आहे का? किंवा तो व्यक्ती क्रेडीट कार्डचे बिल वेळेवर भरतो का? या सर्व गोष्टी बघितल्या जातात आणि त्यावर त्याचा स्कोर ठरवण्यात येतो.

एखाद्या व्यक्तीचा स्कोर तेव्हाच चांगला असू शकतो जेव्हा तो आपल्या घेतलेल्या कर्जाचे हफ्ते वेळेवर भरत असेल किंवा आपल्या क्रेडीट कार्डचे बिल न चुकता भरत असेल. हे लक्षात ठेवा की, या स्कोरमध्ये तुमची बचत, गुंतवणूक आणि फिक्स डिपोजिटची माहिती गृहीत धरली जात नाही.


सिबिल कसे काम करते?

उपयुक्त रेकॉर्डस, बँक आणि इतर आर्थिक संस्थांकडून मासिक आधारावर सिबिल रेकॉर्ड जमा केले जातात. याच माहितीचा उपयोग करून Credit Informational record (CIR) अर्थात क्रेडीट स्कोर बनवला जातो. क्रेडीट ब्युरो RBI द्वारे २००५ च्या कलमानुसार मंजूर करण्यात आली आहे. तुमचा सिबिल स्कोर जेवढा जास्त असेल तेवढी कर्ज मिळण्याची संभावना जास्त असते.


आदर्श सिबिल स्कोर किती आहे?

एक चांगला सिबिल स्कोर हा ७५० ते ९०० च्या दरम्यान असतो. जर तुमचा स्कोर ७५० च्या वर असेल तर तुम्हाला कोणतीही बँक आणि नॉन बँकिंग संस्था लगेचच कर्ज देईल, पण जर सिबिल स्कोर ७५० च्या खाली असेल तर अश्या व्यक्तीला कर्ज देण्यामध्ये खूप समस्या येतात.

 
सिबिल स्कोर कसा सुधारू शकता?

१. आपले हफ्ते किंवा क्रेडीट कार्डचे बिल वेळेवर भरत राहा.
२. खूप जास्त क्रेडीट कार्डचा वापर करणे योग्य नसते त्यावर नियंत्रण ठेवा.
३. तुम्हाला तुमच्या कर्जामध्ये सुरक्षित (गृह कर्ज आणि वाहन कर्ज) आणि असुरक्षित (वैयक्तिक कर्ज आणि क्रेडीट कार्ड्स) अश्या कर्जांचा समावेश करणे गरजेचे आहे.
४. कर्ज घेण्यासाठी प्रत्येकवेळी घाई करू नका. तुम्हाला कर्जाची फार गरज आहे असे जाणवू देऊ नका.
५. तुम्ही वर्षभरामध्ये एकदा तरी आपल्या क्रेडीट हिस्ट्री बद्दल नक्की जाणून घ्या.
६. कोणत्याही आर्थिक वर्षामध्ये घेतल्या गेलेल्या कर्जाची संख्या कमी करणे गरजेचे आहे.
७. आपल्या ईएमआयचे प्रमाण कमी करावे.

 

solved 5
General Knowledge Tuesday 13th Dec 2022 : 09:47 ( 1 year ago) 5 Answer 7995 +22