सहकारी संस्था म्हणजे काय?www.marathihelp.com

सहकारी संस्था म्हणजे एखाद्या व्यक्ती समुहाने स्वच्छेने एकत्रित येऊन स्थापन केलेली संस्था होय. भारतीय सहकारी कायदा १९१२;कलम -४ सी ,नुसार ,"सहकारी तत्त्वानुसार आपल्या सभासदाचे आर्थिक हितसंवर्धन करणारी संस्था म्हणजे 'सहकारी संस्था ' होय.


वैशिष्ट्ये : 


१ ) ऐच्छिक संघटन :
सहकारी संस्था ही एक ऐच्छिक संघटना असते सर्व सभासद आपल्या समान उद्दीष्ट्ये साध्य करण्यासाठी स्वच्छेने एकत्रित आलेले असतात . समता व एकता यावर त्याचा विस्वास असतो . 

 २) खुले सभासदत्व:
सहकारी संस्थेचे सभासदत्व सर्वांसाठी खुले असते . जात,धर्म ,पंथ ,वंश असा भेद न करता सामान हित असणाऱ्या सर्व व्यक्तीनां संस्थेचे सभासदत्व दिले जाते . 
३) नोंदनी  : 
एकत्रित आलेल्या व्यक्ती समुहाने सहकारी कायद्यानुसार संस्थेची नोंदणी करावयाची  
असते . नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी केल्यानंतर सहकारी संस्थेला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होते . 
४)मतदानाचा समान हक्क /एक व्यक्ती एक मत :
सहकारी संस्थेत 'एक व्यक्ती एक' मत या पद्धतीने सभासदांना मताधिकार दिला जातो . भांडवली संस्थेप्रमाणे एक भाग एक मत असे तत्व नसते .सर्व कारभार लोकशाही पद्धतीने चालवला जातो . 
५) मर्यादित जबाबदारी किंव्हा दायित्व :
सहकारी संस्थेतील सभासदाची  जबाबदारी हे मर्यादीत असते . सहकारी संस्थेतील निर्माण होणाऱ्या तोट्यास सभासदना व्यक्तिसाहा जबाबदार धरल जात नाही .फक्त त्यांनी गुंतवलेली रक्कमच जबाबदार धरली जाते. 
६) लोकशाही कारभार :
संस्थेचा कारभार लोकशाही तत्वाने चालविला जात असल्यामुळे संस्थेत आर्थिक सत्तेचे केंद्रीयकारण होत नाही. सर्वाना समान संधी प्राप्त होत असते.  

७) सभासद संख्या :
समान हित असलेल्या वेगवेगळ्या कुटुंबातील किमान दहा व्यक्ती सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी आवश्यक असतात . जास्तीत जास्त सभासद संख्येवर मर्यादा नाही पण सभासद होणारी व्यक्ती ही त्या विशिष्ट क्षेत्रातील किंव्हा विभागातील असावी असे बंधन असते .





फायदे : 


१) सुलभ स्थापना :-
सहकारी संस्था सुरु करण्याची पद्धत सोपी असते . यासाठी कमीत कमी दहा सभासदाची आवश्यकता असते .सहकारी संस्थेच्या नोंदणीची पद्धत कंपनी स्थापनेच्या तुलनेत सोपी व कमी खर्चाची असते .
२) खुले सभासदत्व :
सहकारी संस्थेत समान हित असलेल्या कोणत्याही व्यक्तीला सभासदत्व प्राप्त करता येते . सभासदत्व दिले जात असताना जात, धर्म , पंथ इत्यादी बाबींचा अडसर येत नाही .तसेच कोणीही सभासद केव्हाही आपल्या सभासदत्वाचा राजीनामा देऊ शकतो.
 ३)सातत्य व स्थेर्य :
सहकारी संस्था कायद्याने निर्माण झाली असल्यामुळे  संस्थेच्या सातत्यावर सभासदांच्या मृत्यू ,दिवाळखोरी ,राजीनामा ,नादारी याबाबींचा संस्थेवर कोणताच परिणाम होत नाही. सहकारी संस्थेला स्वतःची सर्वमान्य नामुद्रा असते .त्यामुडे संस्थेला स्थेर्य लाभलेल असते .
 ४) वस्तूच्या कमी किमती :
सहकारी ग्राहक भंडारांमध्ये वस्तूच्या किंमती कमीत कमी असतात. कारण मध्यस्थांच्या उच्चाटनामुडे  वस्तूच्या किंमती कमी ठेवने सोपे जाते . 
 ५) नफ्याचे समान वाटप : 
सहकारी संस्थेत नफ्यातील काही हिस्सा सभासदांचा व काही हिस्सा समाज हितासाठी राखुन ठेवल्या जातो . संस्थेत नफ्याची वाटणी हि समान तत्त्वावर केली जाते . नफ्याची वाटणी करतांना गुंतवणूक विचारात घेतली जात नाही.
६ ) मर्यादित जबाबदारी :
सहकारी संस्थेच्या सभासदांची जबाबदारी किंव्हा देयता त्यानीं खरेदी केलेल्या भागांवर न दिलेल्या रक्कमे येवडिच मर्यादित असते .त्यामुळे सभासदांच्या व्यक्तिगत अथवा खाजगी मालमत्तेवर टाच आणून संस्था आपली देणी भागवू शकत नाही .





तोटे :- 


१) मर्यादित भांडवल :
सहकारी संस्थेचे सभासद हे मध्यम व कमी उत्पन्न गटातील असतात .त्यामुळे त्यांची बचत कमी असते .कमी बचती मुळे ते जास्त भांडवलाची गुंतवणूक करू सकत नाही .शिवाय व्यवस्थापनात ' एक सभासद एक मत ' हा नियम असतो व लाभांश दरात मर्यादा (जास्तीत जास्त १५% दराने ) असते . या सर्व कारणांमुळे सहकारी संस्थेला कंपनी प्रमाणे मोठया प्रमाणात भांडवल उभे करणे अशक्य असते . 

२) अकार्यक्षम व्यवस्थापन :
व्यवस्थापन समितीचे सभासद सक्रिय असतात .परंतु पुष्कळदा त्यांच्यात व्यापार कौशल्य ,तांत्रिक ज्ञान व अनुभव यांचा अभाव असतो . तसेच ,कर्मचारी वर्गाचे पगारही आकर्षक नसतात . या कारणा मुळे सहकारी संस्थांना व्यवस्थापनात ,सुशिक्षित ,अनुभवी ,कुशल, व कार्यक्षम अशा व्यक्ती लाभत नाहीत . परिणामी ,व्यवस्थापन अकार्यक्षम बनते .
३) गुप्ततेचा अभाव किंव्हा लोकांचा अविश्वास : 
सहकारी संस्थेत व्यवसायिक गुप्तता पाळली जात नाही . कारण सभेद्वारे सर्व बाबी सार्वजनिक केल्या जातात .
४) निष्क्रिय सहकारी संस्थेत वाढ :
भारतात असंख्य सहकारी संस्था निष्क्रिय स्वरूपाच्या आहे . या संस्थांची नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणी झालेली असते . पण त्या संस्थेचे कोणतेही कार्य चालू नसते . संचालक मंडळाची निवड नाममात्र असते . अशा सहकारी संस्थेची संख्या भारतात वाढत चालली आहे .
५) सभासदांमधील मतभेद :
सहकारी संस्थेच्या सभासदांमध्ये समानता निस्वार्थीपणा व सेवा यात एकमत असलेतरीही कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि निवडणुका यावरून गट निर्माण होऊन सभासदान मध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता असते .त्याचा परिणाम सहकारी संस्थेवर होतो .
६) मर्यादित विस्तार :
सहकारी संस्थेकडे असलेल्या मर्यादित भांडवलमधून सहकारी संस्था तज्ञ व कुशल व्यवस्थापकाची नियुक्ती करू शकत नाही . त्यामुळे सहकारी संस्थेचा विस्तार त्या प्रमाणात होऊ शकत नाही .परिणामता विस्तारावर मर्यादा पडते .

solved 5
General Knowledge Monday 12th Dec 2022 : 12:05 ( 1 year ago) 5 Answer 7768 +22