सरासरी जागतिक उत्पादनात कृषी क्षेत्राचा वाटा किती आहे *?www.marathihelp.com

कृषी आणि अन्न व्यवस्थापन

भारतीय कृषी क्षेत्राची वाढ नेहमीप्रमाणे वर्तृळाकार गतीची राहिली.
2014-15 मध्ये कृषी क्षेत्राचे सकल मूल्यवर्धन 0.2 टक्के होते. ते 2016-17 मधे वाढून 6.3 टक्के इतके झाले. परंतु पुन्हा 2018-19 मधे ते घसरुन 2.9 टक्के झाले.
कृषी क्षेत्रातून सकल मूल्यवर्धनाच्या टक्केवारीत निर्माण होणारे एकूण भांडवल 2016-17 मधे 15.6 टक्के इतके होते, ते 2017-18 मधे घसरुन 15.2 टक्के झाले.
2013-14 मधे कृषी क्षेत्राची एकूण मूल्यवर्धनाधित भांडवल निर्मिती 2.1 दशांश टक्के होती, ती वाढून 2016-17 मधे 2.7 दशांश टक्के झाली.
कृषी क्षेत्रातील महिलांचा सहभाग 2015-16 मधे 13.9 टक्के राहिला. 2005-6 दरम्यान ही टक्केवारी 11.7 टक्के होती. लघु आणि सीमांत शेतकरी कुटुंबातील महिला सहभागाची टक्केवारी सर्वाधिक म्हणजे 28 टक्के होती.
देशभरात वापरात येणाऱ्या एकूण भूजलापैकी 89 टक्के सिंचनासाठी वापरले जाते म्हणून शेतीच्या उत्पादकते ऐवजी सिंचनजलाची उत्पादकता ही धोरणात्मकदृष्ट्या महत्वाची बाब ठरली पाहिजे. पाण्याच्या वापराची कार्यकुशलता वाढवण्यासाठी सुक्ष्म सिंचनावर भर देणे गरजेचे आहे.

रसायनिक खतांना पिक वृद्धिने मिळणारा प्रतिसाद कमी होत आहे. सेंद्रीय आणि नैसर्गिक शेती तंत्रज्ञान विकासाने शून्याधारित नैसर्गिक कृषी अंदाजपत्रक वापरल्याने पाण्याच्या उपयोगाची कार्यकुशलता आणि जमिनीचा कस सुधारु शकतो.
कृषी क्षेत्रात उपजिविकांमधे विविधता आणणे आणि दुग्धविकासाला चालना देणे गरजेचे आहे.
पशु पालन आणि मत्स्योद्योग व्यवसाय हे भारतात सर्वाधिक उत्पादकतेचे विभाग आहेत.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 16:15 ( 1 year ago) 5 Answer 4440 +22