समुपदेशक म्हणून शिक्षकाची भूमिका काय?www.marathihelp.com

उत्तम शिक्षक हा उत्तम समुपदेशक होऊ शकतो. प्रत्येक शिक्षकानं समुपदेशकाचं कौशल्य अंगी बाणवणं आवश्यक आहे. यासाठी सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास म्हणून सातत्याने दीर्घकालीन अभ्यासक्रमासाठी शिक्षकांना पाठवलं गेलं पाहिजे. अभ्यास करून आल्यावर अशा प्रकारचं काम आणि कामाचे इन्सेन्टिव्ह त्याला दिले गेले पाहिजेत.

समुपदेशनाचे प्रकार : समुपदेशक हा समुपदेशनप्रक्रियेत कोणत्या दृष्टिकोणातून भाग घेतो त्यानुसार समुपदेशनाचे पुढील प्रकार पडतात :


अनिर्देशित समुपदेशन : यात समुपदेश्य हा केंद्रबिंदू असतो. अरबुकल यांच्या मते, ‘अनिर्देशित समुपदेशनामध्ये समुपदेश्यास स्वत:ची जाणीव व स्वत:विषयीची समज प्राप्त करून देण्यासाठी मदत केली जाते.ʼ या नव्या उद्बोधनामुळे समुपदेश्य स्वत: समस्या सोडविण्याच्या दृष्टीने पावले उचलतो. समुपदेश्यामध्ये जाणीव व समज निर्माण करणे, हे समुपदेशकाचे काम असते.

निर्देशित समुपदेशन : अरबुकल यांच्या मते, ‘स्वत:च्या समस्या कशा सोडवावयाच्या हे शिकण्यास मदत करणे, हा निर्देशित समुपदेशनाचा उद्देश असतो.ʼ यात समुपदेशक प्रौढ विद्यार्थ्यांचा कल व त्यांच्यामध्ये वसत असलेले सुप्त गुण यांची योग्य प्रकारे दखल घेऊन त्यानुसार त्यांना मार्गदर्शन करतो. तो विद्यार्थ्यांना कोणता अभ्यासक्रम निवडावा, कोणता जीवनमार्ग निवडावा आणि व्यक्तिगत अडचणींना कसे सामोरे जावे, यांविषयी मार्गदर्शन करतो. त्यांच्या व्यक्तिविकासात समुपदेशकाची भूमिका महत्त्वाची असते. म्हणजेच समुपदेशक हा समुपदेशनप्रक्रियेचा केंद्रबिंदू असतो.

सर्वसंग्रहात्मक समुपदेशन : कोणत्याही एका विशिष्ट प्रकारास चिकटून न राहता जेव्हा समुपदेशन केले जाते, तेव्हा त्यास सर्वसंग्रहात्मक समुपदेशन म्हणतात. या प्रकारात समुपदेशक हा बुद्धिपुरस्सर निर्देशित आणि अनिर्देशित अशा दोन्ही प्रकारांतील उपयुक्त बाबींचा उपयोग करतो. या प्रकारांचा उपयोग करण्यापूर्वी त्याने अन्य पद्धतींचा चांगला अभ्यास व सराव केलेला असणे आवश्यक असते. समुपदेशक जसजसा अनुभव मिळवितो, तसतसा तो सर्वसंग्रहात्मक समुपदेशनचा अधिकाधिक उपयोग करू शकतो. समुपदेश्याच्या व्यक्तिगत गरजा लक्षात घेऊन तो प्रत्येक वेळी उपचारपद्धती बदलतो; कारण समुपदेशनात कोणती एक पद्धती वापरली आहे, याला महत्त्व नसून वापरलेली पद्धती कितपत परिणामकारक आहे किंवा नाही, यास जास्त महत्त्व असते. प्रत्येक वेळी समस्येचे स्वरूप तेच असेल, असे नाही. समुपदेशन हे व्यक्तीच्या जीवनात मार्गदर्शक ठरतेच; पण शैक्षणिक व व्यावसायिक अडचणींतही ते उपयुक्त ठरते. बहुसंख्य व्यावसायिक समुपदेशक हे शाळा-महाविद्यालयांत असतात. अमेरिकेत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांतून सवेतन पूर्ण वेळ काम करणारे समुपदेशक असून ते विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन करतात.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 14:29 ( 1 year ago) 5 Answer 4194 +22