समीक्षकांचा मुख्य हेतू काय असतो?www.marathihelp.com

समीक्षकांचा मुख्य हेतू काय असतो?
समीक्षक हा साहित्याचीपूर्वपरंपराही डोळसपणे पाहतो, तिचे आणि साहित्यातील नवतेचे नातेशोधतो, नव्या दृष्टीने जुन्याचे नव्यानेमूल्यमापन करतो, हे सर्वसाहित्याच्या दृष्टीने उपकारक असते.

साहित्यसमीक्षा : ( लिटररी क्रिटिसिझम ). ह्या लेखनप्रकारातसामान्यत: पुढील लेखनाचा समावेश केला जातो : साहित्यविषयकप्रश्नांची चर्चा करणारे लेखन व साहित्याच्या संदर्भातील सैद्घांतिकस्वरुपाचे लेखन हे स्थूलमानाने तात्त्विक ( थिअरेटिकल ) समीक्षेत मोडतेतर विशिष्ट साहित्यकृतीचे स्वरुप, तिचे मर्म, तिचे रहस्य विशद करणारेलेखन, तसेच विशिष्ट साहित्यकृतीच्या गुणदोषांचे परीक्षण करणारे लेखनहे उपयोजित ( ॲप्लाइड ) समीक्षेत मोडते. तद्वतच एखाद्या लेखकाच्यासंपूर्ण साहित्याचे मूल्यमापन करणारे लेखन, तसेच लेखनतंत्राचा उलगडाकरणारे लेखन ह्यांचा समावेशही स्थूलमानाने उपयोजित समीक्षेत केलाजातो. अर्थातच वरील वर्गवारी व त्याखाली समाविष्ट केले जाणारेलेखनप्रकार ह्यांच्यात निश्चित व काटेकोर अशी सीमारेषा आखता येतनाही कारण सैद्घांतिक स्वरुपाच्या समीक्षेतही विशिष्ट साहित्यकृती वलेखक यांचे संदर्भ तसेच विवरण-विश्लेषण येणे जसे स्वाभाविक ठरतेतद्वतच उपयोजित समीक्षेतही सैद्घांतिक चर्चा त्या विशिष्ट लेखकाच्यासाहित्यकृतीच्या अनुषंगाने येणे हे कित्येकदा अपरिहार्य ठरते.

साहित्यसमीक्षेचे आद्य उद्दिष्ट म्हणजे सम्यक् आकलन अथवा दर्शनहे असते. त्यात त्या साहित्यकृतीचे अर्थग्रहण हे प्रथम येते. त्यानंतरतिचे गुणग्रहण, रसग्रहण, मर्मग्रहण, सौंदर्यग्रहण ह्या गोष्टी येतात परंतुसमीक्षा एवढ्यावरच थांबत नाही. ती साहित्यकृती ज्यासाहित्यप्रकारातमोडते, त्या साहित्यप्रकारातील अन्य कृतींमध्ये तिचे स्थान काय आहे,ती त्या कृतींहून श्रेष्ठ असल्यास तिची श्रेष्ठता वा महात्मता कशात आहे,हेही समीक्षक सांगण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यामुळे समीक्षेचे दुसरेउद्दिष्ट साहित्यकृतीचे मूल्यमापन हे ठरते. त्यातून वाचकांच्या अभिरुचीलावळण लावण्याचे उद्दिष्टही अप्रत्यक्षपणे वा अनुषंगाने साधते तथापिह्यावरुन समीक्षा ही परार्थच असते, असे म्हणता येत नाही कारणसमीक्षा हा एक शोध आहे. कोणत्याही साहित्यकृतीचे स्वरुप, तिचीवैशिष्ट्ये, तिचे सौंदर्य, तिच्या महात्मतेचे रहस्य ह्यांचा शोध समीक्षक स्वत:साठी घेत असतो. ते त्याचे प्रकट चिंतन असते. कोणतीही साहित्यकृती ही स्वत:चे नियम आणि तंत्र घेऊन अवतीर्ण होते, ते समजून घेणेहे समीक्षेचे खरे कार्य आहे. त्यामुळे समीक्षा ही परार्थ नसून स्वार्थचअसते, असेही मत मांडले गेले आहे.

समीक्षेची जी विविध उद्दिष्टे आहेत, त्यांना अनुसरुन –उदा., सम्यकआकलन-दर्शन आणि मूल्यमापन ही उद्दिष्टे–समीक्षेचे वेगवेगळे प्रकारआणि तिच्या पद्घती निष्पन्न होतात. उदा., साहित्यसमीक्षेच्या आकलन-दर्शनासाठी अर्थग्रहणादी ज्यापाच पायऱ्या वर निर्देशिल्या आहेत,त्यांतील अर्थग्रहण ही पायरी घेतली, तरी केवळ अर्थलापनिकेस प्राधान्यदेणारा संस्कृत टीकेचा प्रकार समोर येतो. हे करण्यास साहित्यकृतीचीमूळ अधिकृत संहिता अगर पाठ निश्चित करणे आवश्यक असते. तेकरणारा समीक्षाव्यापार हा ⇨ पाठचिकित्सा ह्या नावाने ओळखलाजातो मात्र पाठचिकित्सेच्या आधारे मूळ अधिकृत संहिता निश्चितकरणाऱ्या लेखनाचा समावेश साहित्यसमीक्षेत केला जात नाही. अर्थलापनिकेला जवळचा असलेला समीक्षाप्रकार हा आलंकारिक समीक्षेचावा टीकेचा ( ऱ्हेटॉरिकल क्रिटिसिझम ) म्हणता येईल. विशिष्ट काव्यकृतीचे गुण आणि अलंकार ही जी अंगे आहेत, त्यांची चर्चा करणारी हीसमीक्षा होय. साहित्यसमीक्षेच्या काही प्रकारांचे विवेचन पुढे केले आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 10:20 ( 1 year ago) 5 Answer 5435 +22