समाजशास्त्र मनजे काय?www.marathihelp.com

समाजशास्त्र मनजे काय?

समाजशास्त्र (Sociology) म्हणजे माणसाचा समाजाशी असलेल्या आंतरसंबंधांचा अभ्यास होय. समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. यात सामाजिक घटक व सामाजिक घडामोडींचा समावेश असतो. समाजाचे मन, मनाचा एकूण कल व समाज पाळत असलेले रीतिरिवाज यांचा शोध या शास्त्रात घेतला जातो. सामाजिक प्रश्नांची उकल करण्यासाठी समाजशास्त्र उपयुक्त असते. हे शास्त्र आंतरविद्याशाखीय स्वरूपाचे आहे. यामुळे याचा मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास व संख्याशास्त्र अशा अनेक शाखांशी संबंध येतो. यामध्ये लोकांच्या जीवनाचे वास्तव चित्रणाचे रूप रेखाटले जाते. लोकांच्या सामाजिक प्रश्नांचे निवारण येथे केले जाते.

इ.स. 1839 मध्ये फ्रेंच समाजशास्त्रज्ञ आगस्तकाँन याने ही संज्ञा सर्व प्रथम उपयोगात आणली. ही संज्ञा (सोसिअस) या लॅटिन आणि ष्स्वहवेष् (लोगाॅस) या ग्रीक शब्दापासून बनलेली आहे. यातील या शब्दाचा अर्थसोबती व स्वहवे या शब्दाचा अर्थ शास्त्र असा होता. एकूण म्हणजे संगतीचे किंवा सोबतीचे पर्यायाने समाजाचे शास्त्र होय. आगस्ट कौन ने ही संज्ञा उपयोगात आणण्यापूर्वी समाजाचे अध्ययन करणारे शास्त्र हे भौतिक शास्त्राप्रमाणे स्वतंत्र शास्त्र असावे या हेतूने सामाजिक भौतिक ही संज्ञा वापरली. परंतु पुढे घटनांच्या अध्ययनासाठी कितपत तंतोतंत उपयोगात आणता येतील असा प्रश्न निर्माण झाल्या कारणाने त्यांच्या ऐवजी ही संज्ञा वापरली. आणि तेव्हापासून समाजाचे शास्त्र म्हणून असा शब्द उपयोगात आणला गेला.



आधुनिक समाज शास्त्राचे जनक

आधुनिक समाज शास्त्रात ऑगस्ट कॉम्ट (August Comte) हा समाजशास्त्राचा जनक मानला जातो. इ.स. १८३९मध्ये त्याने सामाजिक भाषणात आणि नंतर Positive philosophy या ग्रंथात "समाजशास्त्र" या शब्दाचा पहिल्यांदा पाश्चात्य जगात वापर केला होता. भारतात आणि चीन देशात हा वापर आधीपासूनच होता.

१. लेस्टर वार्डः
‘समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे’ प्रस्तुत व्याख्येत वार्ड ने समाजशास्त्राचा अभ्यास म्हणून ‘समाजाचा उल्लेख’ केलेला आहे. परंतु समाजातील कोणत्या अंगाचे आणि कोणत्या रितीने अध्ययन केले पाहिजे यासंबंधी संकेत दिलेला नाही.

२. फ्रॅन्कलीन गिडिंगजः
समाजशास्त्रात संपूर्ण समाजाचे व्यवस्थितरित्या वर्णन आणि स्पष्टीकरण करण्यात येते.
वरील परिभाषेत संपूर्ण समाजाचे व्यवस्थितरित्या अध्ययन करण्यात येते असे सुचविले आहे.

३. आगबर्न व निमकाॅकः
”समाजजीवनाचे वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करणाऱ्या शास्त्रास समाजशास्त्र असे म्हणतात.“

येथे समाजाचे शास्त्रीय रितीने अध्ययन केले पाहिजे. हे नमूद करताना अभ्यासासाठी वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करण्याची गरज प्रधान मानली आहे.

४. मॅक आयव्हर व पेजः
समाजशास्त्राचा अभ्यास विषय सामाजिक संबंध आहे.

५. मार्षल जोन्सः
समाजशास्त्रात मानवाचा अनेक मानवांशी असलेला संबंध अभ्यासण्यात येतो.

६. हॅरी जाॅन्सनः
समाजशास्त्रात सामाजिक समूहांचा अभ्यास करण्यात येतो.

७. मॅक्स वेबरः
समाजशास्त्र हे असे विज्ञान आहे की, ज्यात सामाजिक क्रियांच्या निर्वाचनात्मक आकलनाचा प्रयत्न करण्यात येतो.

८. अल्केष इकेल्सः
समाजशास्त्रात सामाजिक क्रिया व्यवस्थेचा आणि त्यातील पारंपारिक संबंधाचा अभ्यास केला जातो.


समाजशास्त्राचे घटक :

वर सांगितलेल्या व्याख्येवरून समाजशास्त्राचा अध्ययनविषयाबाबत खालील घटक स्पष्ट करण्यात येतात.

अ. मानवी समाजाचे अध्ययन. ब्. सामाजिक संबंधाचे अध्ययन. क्. सामाजिक समूहाचे अध्ययन. ड्. सामाजिक क्रियांचे अध्ययन.

१. मानवी समाजाचे अध्ययनः

समाजशास्त्रा संपूर्ण मानवी समाजाचे अध्ययन केले पाहिजे. समाजशास्त्रात समाजाच्या कोणत्याही एका अंगाचे अध्ययन केले म्हणजे समाजाचे संपूर्ण आकलन होऊ शकत नाही. संस्था किंवा समूह हे घटक स्वतंत्र नसतात ते परस्पर संबंधित व परस्पर अवलंबित असतात. त्यामुळे कोणताही अभ्यास करताना सर्व घटकांचा संदर्भ विचारात घ्यावा लागतो. म्हणून समाजशास्त्राचा अभ्यासविषय संपूर्ण मानवी समाज असला पाहिजे.

२. सामाजिक संबंधाचा अभ्यासः

काही अभ्यासकांच्या मते समाजशास्त्राचा अभ्यासविषय सामाजिक संबंध असला पाहिजे कारण त्यांच्या मते मानवी समाज व्यक्ती, व्यक्ती मिळून बनलेला असतो. सर्व व्यक्ती एकमेकांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या, संबंधित असतात. समाज म्हणजे सामाजिक संबंधाचे जाळे होय. त्यामुळे समाजशास्त्रात संबंधांचा अभ्यास झाला पाहिजे.

३. सामाजिक समूहांचे अध्ययनः

जाॅन्सन यांच्या व्याख्येनुसार समाजशास्त्र अभ्यासविषय सामाजिक समूहांचे अध्ययन असावे. त्यांच्यामते समाज हा एक विशाल समूह आहे. या समूहात अनेक उपसमूह असतात. हे समूह परस्परांशी संबंधित असतात. समाजातील सभासद आपल्या सर्व जीवनावश्यक गरजा एकट्याने भागवू शकत नाहीत. त्यांना एकमेकांचे सहकार्य घ्यावे लागते. यासाठी ते एकत्र येतात. आणि समूहाची निर्मिती होते. म्हणून समाजशास्त्रात सामाजिक समूहांचा अभ्यास झाला पाहिजे.


४. सामाजिक क्रियांचे अध्ययनः

मॅक्स वेबर व इतर समाज शास्त्रज्ञानानुसार समाजशास्त्राचा अभ्यासविषय सामाजिक क्रिया असला पाहिजे. सामाजिक जीवनात सामाजिक क्रिया मध्यवर्ती असतात. ज्याप्रमाणे मूलद्रव्यात ‘परमाणू’ जसा लहानात लहान असून देखील अर्थपूर्ण असतो. त्याप्रमाणे सामाजिक क्रिया महत्त्वाच्या असतात.

वरील बाबींवर समाजशास्त्रात अभ्यास करण्यात यावा असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

solved 5
सामाजिक Monday 5th Dec 2022 : 14:27 ( 1 year ago) 5 Answer 4167 +22