संसदेत किती सदस्य आहेत?www.marathihelp.com

लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. लोकसभा हे जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. लोकसभा मताधिकारांच्या आधारे थेट निवडणुकीने निवडलेल्या लोकप्रतिनिधींची बनलेली असते. राज्यघटनेत या सभागृहाची अधिकतम सदस्यसंख्या ५५२ आहे, ज्यात राज्यांचे प्रतिनिधित्व म्हणून ५३० सदस्य, केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व म्हणून २० सदस्यांपर्यंत आणि राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले अँग्लो-इंडियन समाजाचे दोन सदस्य अशी निवड केली जाते. प्रत्येक राज्यासाठी देण्यात आलेल्या जागांची संख्या आणि राज्याची लोकसंख्या यांच्यातील गुणोत्तर आतापर्यंत सर्व राज्यांसाठी समान आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 11th Oct 2022 : 11:34 ( 1 year ago) 5 Answer 340 +22