संशोधनाचे निष्कर्ष कसे असावेत?www.marathihelp.com

संशोधनाचे निष्कर्ष कसे असावेत?

अहवाल लेखन- संशोधन कार्यातील शेवटचा टप्पा म्हणजे अहवाल लेखन होय. संशोधन अहवालात संशोधक संशोधनाचे शास्त्रीय पद्धतीने विवेचन करून निष्कर्षाची मांडणी करत असतो. त्यासाठी आवश्यक पुरावे, तक्ते, नकाशे, छायाचित्रे, आकृत्या, संदर्भ इत्यादींचा अहवालात समावेश करत असतो. अहवालाचे लेखन काळजीपूर्वक आणि शास्त्रीय भाषेत केले जाते. अहवालात प्रस्तावना, मुख्य मजकूर, भविष्यातील संशोधनाच्या संधी, संदर्भ सूची आणि परिशिष्टे यांचा समावेश असतो. अहवालाच्या माध्यमातून संशोधक आपली फलनिष्पत्ती सर्वांसमोर मांडत असतो. अहवालाच्या माध्यमातून संशोधकाच्या श्रम, परिश्रम आणि दर्जाची जाणीव होत असते.

solved 5
वैज्ञानिक Tuesday 6th Dec 2022 : 10:19 ( 1 year ago) 5 Answer 4661 +22