संभाजी राजे नंतर छत्रपती कोण आले?www.marathihelp.com

त्यांचे पुत्र राजाराम महाराज कोल्हापूरच्या गादीवर आले. 1940 पर्यंत त्यांनी कोल्हापूरचा राज्यकारभार सांभाळला. त्यानंतर 1946 पर्यंत शिवाजी हे कोल्हापूरचे राजे होते.

राजाराम महाराज यांचा राज्यकारभार

संभाजी महाराजांच्या निधनानंतर राजाराम महाराज काही काळ महाराष्ट्रात राहिले आणि ते तामिळनाडूत जिंजी इथल्या मराठी स्वराज्याच्या मुलखात गेले.

तेथून ते महाराष्ट्र आणि जिंजीचा कारभार रामचंद्र पंत अमात्य बावडेकर, संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांच्या सहाय्याने चालवत होते.

जिंजीचा किल्ला

जिंजीचा किल्ला, तामिळनाडू

तेथे 8 वर्षे राज्यकारभार केल्यानंतर 1698 साली ते महाराष्ट्रात परत आले. त्यानंतर त्यांच्या मृत्यूपर्यंत 1700 पर्यंत ते महाराष्ट्रातच होते. वयाच्या 30 व्या वर्षी त्यांचा सिंहगडावर निधन झालं.
ताराराणी यांच्याकडे सूत्रे

राजाराम महाराज यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी ताराराणी यांनी आपला मुलगा शिवाजी (दुसरे) यांना गादीवर बसवून राज्यकारभार सुरू केला. ताराराणी या हंबिरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. त्यांना महाराणी ताराबाई असंही म्हटलं जातं.


ताराराणी

महाराणी ताराबाई यांचा पन्हाळ्यावरील राजवाडा

इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगतात, "राजाराम महाराज यांना शाहू महाराज मुघलांच्या कैदेतून सुटून परत येतील आणि ते राज्यकारभार सांभाळतील असं वाटायचं. मात्र ताराराणी यांचं मत वेगळं होतं. हे राज्य नवं आहे. राजाराम महाराजांनी मिळवलेलं, टिकवलेलं आहे अशी त्यांची भूमिका होती."

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 09:37 ( 1 year ago) 5 Answer 5930 +22