संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्द समूहाला काय म्हणतात?www.marathihelp.com

पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा 'अर्थपूर्ण' शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. वाक्य हे भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: अक्षर, वर्ण, शब्द व व्याकरण) एक आहे. एखाद्या शब्दाला किंवा शब्द समूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला वाक्य असे म्हणतात.

वाक्याचे प्रकार :

केवल वाक्य :
ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास 'केवल' किंवा 'शुद्ध' वाक्य म्हणतात [१]
उदा. १) आम्ही जातो आमुच्या गावा २) तानाजी लढता लढता मेला.

वरील वाक्यात एकेकच विधान आहे. म्हणजे प्रत्येकात एकच उद्देश (कर्ता-Subject) व एकच विधेय (Predicate) आहे. पहिल्या वाक्यात 'आम्ही' व दुसऱ्या वाक्यात 'तानाजी' ही उद्देशे आहेत. तसेच पहिल्या वाक्यात 'जातो आमुच्या गावा' व दुसऱ्या वाक्यात 'लढता लढता मेला' ही विधेये आहेत.


मिश्र वाक्य :
एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौणवाक्ये गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडून जे एक संमिश्र वाक्य तयार होते त्यास 'मिश्र वाक्य असे म्हणतात.
उदा. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो.

आकाशात ढग जमतात हे गौणवाक्य आहे. तेव्हा मोर नाचू लागतो हे प्रधानवाक्य आहे. आणि 'जेव्हा' या गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने ते जोडले आहे.

संयुक्त वाक्य :
दोन किंवा अधिक केवल वाक्ये प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक जोड वाक्य तयार होते त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात.
उदा० आकाशत ढग जमतात आणि मोर नाचू लागतो.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 12:29 ( 1 year ago) 5 Answer 3912 +22