व्यापारी हुंडी म्हणजे काय?www.marathihelp.com

हुंडी बाजार, भारतातील : हुंडी बाजार म्हणजे हुंड्यांचा बाजार अथवा हुंड्यांची जेथे जेथे देवघेव केली जाते, अशी सर्वठिकाणे. भारतात हुंडी-व्यवहाराचे नियमन चलनक्षम दस्तऐवजाचा कायदा १९८१ नुसार केले जाते. 

हुंडी-व्यवहार हा व्यापाऱ्यांस त्यांच्या उधार विक्रीच्या वसुलीसाठी फार उपयोगी पडतो. म्हणून खेळते भांडवल उभारणीमध्ये हुंडी-व्यवहाराचे फार महत्त्व आहे. या व्यवहारात खालील मुद्दे महत्त्वाचे असतात : 

(१) व्यापारी व उत्पादक यांचा फायदा-तोटा हा विक्रीवरअवलंबून असतो. 

(२) विक्री दोन प्रकारची असते : रोख विक्री व उधार विक्री. रोख विक्रीमध्ये पैसे ताबडतोब मिळत असल्याने वसुलीचा प्रश्न नसतो. 

(३) व्यापारी अथवा उत्पादकांस त्यांचा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी खरेदी अथवा उत्पादन करावे लागते आणि त्यासाठी त्यांस पैसे गुंतवावे लागतात. यालाच खेळते भांडवल म्हणतात. 

(४) साहजिकच उधार विक्रीची वसुली जितकी लवकर होईल, तितकी व्यापाऱ्यांची अथवा उत्पादकांची भांडवलाची गुंतवणूक हीकमी प्रमाणात राहील आणि विक्रीच्या झालेल्या वसुलीतून त्यांना व्यापार-उत्पादन करणे सुलभ होईल. 


उधार विक्री ज्या वेळी होते, त्या वेळी व्यापारी हा त्याच ग्राहकावर हुंडी काढतो आणि त्या ग्राहकास तो विशिष्ट रक्कम देण्यासंबंधी लेखी आदेश देतो. त्यात ही रक्कम हुंडीधारकास देण्याचा आदेश साधारणतः असतो. त्याचप्रमाणे ही रक्कम केव्हा द्यावयाची यासंबंधीचा कालावधीही त्यामध्ये सांगितलेला असतो. या कालावधीवरून हुंडी ही मुदत हुंडी(काही विशिष्ट काळानंतर द्यावयाची रक्कम) आहे किंवा दर्शनी हुंडीआहे, हे ठरविले जाते. जर ही हुंडी मुदत हुंडी असेल, तर कायद्या-प्रमाणे असणाऱ्या मुद्रांकावरच (स्टँप पेपर) ही हुंडी काढावी लागते कारण तशी ती नसल्यास तिचे कायदेशीरपणे वसुलीत रूपांतर करता येत नाही.

हुंडी काढण्यामुळे व्यापाऱ्याचा, तसेच ग्राहकाचाही फायदा होत असतो कारण ग्राहकाने हुंडी काढल्याबद्दलची आपली स्वीकृती दिल्यास ती हुंडी त्या व्यापाऱ्यास दुसऱ्याकडे हस्तांतरित करता येते किंवा बँकेत बेचन करता येते आणि या बेचन व्यवहारातून त्यास रोख रक्कम मिळविता येते. ही रोख रक्कम त्यास व्यवहारात वापरता येते. म्हणजेच व्यापाऱ्यास अथवा उत्पादकास खेळते भांडवल हुंडी बेचन व्यवहारातून उभारता येते. हुंडी--व्यवहार ग्राहकासही उपयुक्त ठरतो, तो असा : हुंडीस ग्राहकाने संमती दाखविली की, हुंडी ज्याकरिता काढलेली असते तो माल ग्राहकाच्या ताब्यात येतो आणि त्यास या मालाची विक्री करता येते. ज्या वेळी संमती दाखविलेली हुंडी वटविण्याची अथवा वसूल करण्याची वेळ येते, त्यावेळी ग्राहकाजवळ माल विक्रीपोटी झालेली जमा हजर असल्याने त्यास हुंडीची रक्कम देण्यास काहीच अडचण येत नाही. 

 

हाच व्यवहार हुंडी बेचन करून घेणाऱ्याससुद्धा फायदेशीर असतो कारण हुंडी बेचन करून घेताना हुंडी बेचन दलाल अथवा बँकव्यापाऱ्यास हुंडीची पूर्ण रक्कम न देता थोडी कमी रक्कम देत असतात.वसूल करताना मात्र ते हुंडीत लिहिलेल्या संपूर्ण रकमेची वसुली हुंडी ज्याच्या नावे काढलेली असेल त्याच्याकडून करून घेतात आणि यादोन रकमांतील तफावत हा त्यांचा फायदा व व्याज अशा दोन्हीस्वरूपांत असतो. त्याचप्रमाणे हुंडीची मुदत ही साधारणपणे २-३ महिन्यांचीच असल्याने आणि हुंडी बेचन करून घेण्यापूर्वी दलाल अथवा बँका त्या त्या व्यापाऱ्याच्या पतीप्रमाणे पैसे देत असल्याने बँकांस अथवा दलालांस हुंडी-व्यवहार किफायतशीर पडतो. 

 
भारतामध्ये हुंडी बाजार विकसित झालेला नाही, याची काहीकारणे अशी : 


(१) हुंडीच्या स्वरूपासंबंधी स्पष्टपणा नाही. 

(२) हुंडी ही मालापोटी काढलेली आहे किंवा पैशापोटी काढलेली आहे, याबद्दलची स्पष्ट कल्पना येत नाही. 

(३) मारवाडी, गुजराती, मुलतानी किंवा चेटी इ. विशिष्ट व्यापारी या व्यवहारांत मुरब्बी असूनही ते आपले व्यवहार गुप्त ठेवण्यासाठी बँकांकडून हुंडी बेचन व्यवहार करून पैसे घेत नाहीत. साहजिकच हुंडी-व्यवहाराची मर्यादा या लोकांजवळ असलेल्या पैशांएवढीच असते. 

(४) मुदत हुंडीसाठी जास्त प्रमाणात करावा लागणारा दस्तऐवज खर्चिक असतो. 

(५) हुंडीवर सह्या असणाऱ्या इसमांसंबंधी व त्यांच्या पतीविषयीच्या माहितीचा अभाव. 

(६) निरनिराळ्या प्रकारच्या हुंड्यांसंबंधाने त्या त्या व्यक्तीस मिळणारे वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार व जबाबदाऱ्या निश्चित झालेल्या नाहीत. 

(७) अल्प मुदतीने हुंडी-व्यवहाराइतक्याच फायद्याने उपलब्ध असणारे भांडवलविषयक गुंतवणुकीचे इतर मार्ग, विशेषतः सरकारी कोषागार बिले. 

(८) त्याचप्रमाणे हुंडी-व्यवहाराऐवजी इतर जास्त किफायतशीरमार्गांनी (देणाऱ्याच्या दृष्टीने) पुरविलेले खेळते भांडवल. उदा., हुंडी अथवा मालतारणावर दिलेले कर्ज. 

(९) हुंडी-व्यवहारावर मध्यवर्ती बँकेचे निर्बंध. 

solved 5
General Knowledge Tuesday 13th Dec 2022 : 10:23 ( 1 year ago) 5 Answer 8038 +22