विवाह संस्था म्हणजे काय?www.marathihelp.com

विवाह संस्था म्हणजे काय?

विवाहसंस्था : दोन भिन्नलिंगी व्यक्तींनी संततीची प्राप्ती आणि तिचे संगोपन करण्याच्या उद्देशाने, तसेच समाजाच्या मान्यतेने स्थिर आणि सातत्यापूर्ण लैंगिक जीवन जगण्यासाठी, कायदेशीर दृष्ट्या आवश्यक व समाजमान्य विधींचे पालन करून कौटुंबिक जीवनाची केलेली सुरुवात म्हणजे विवाह होय आणि या विविध विधींचा तसेच संबंधित सामाजिक आणि या विविध विधींचा तसेच संबंधित सामाजिक आणि सांस्कृतिक प्रथांचा समुच्च्य म्हणजे विवाहसंस्था होय.


विवाहसंस्थेचा उगम : विवाहसंस्थेच्या शास्त्रीय अध्ययनाच्या इतिहासात स्वैराचारापासून एकपत्नीकत्वाकडे होत गेलेल्या विवाहसंस्थेच्या वाटचालीचा सिद्धांत एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात इंग्लंडमध्ये व अन्य यूरोपीय देशांत लोकप्रिय झाला होता. व्हिक्टोरिया राणीच्या कालखंडातील समाज हा समाजिक उत्क्रांतीच्या प्रक्रियेतील अत्युच्च बिंदू असून, या समाजात अस्तित्वात असलेली ⇨एकविवाहाची (एकपतिपत्नीकत्वाची) प्रथा ही स्त्रीपुरुषांमधील लैंगिक संबंधाची नितिमत्तेवर आधारलेली आदर्श प्रणाली आहे, असा विचार त्या काळात मान्य झाला होता.


विवाह आणि गृहनिवासासंबंधीचे नियम : अगम्य आप्तसंभोग-निषेधाच्या नियमाच्या सार्वत्रिक अस्तित्वामुळे विवाहच्या वेळी प्रत्येक व्यक्तीस आपला जोडीदार हा स्वतःच्या प्रारंभिक कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तींमधून निवडावा लागतो. त्यामुळे विवाहबद्ध जोडप्यामधील किमान एका व्यक्तीला स्वतः जन्म घेतलेल्या कुटुंबाचा त्याग करून स्वतःच्या जोडीदाराच्या कुटुंबामध्ये राहावयास जाणे भाग पडते. प्रत्येक समाजास लाभलेल्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक परिस्थितीच्या संदर्भात विवाहानंतर कोणी कोणाकडे राहावयास जावे, यासंबंधीचे नियम त्या त्या समाजात अस्तित्वात असल्याचे दिसते. या संदर्भात पाच प्रकारचे नियम निरनिराळ्या समादांत अस्तित्वात असल्याचे आपणास दिसते. हे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत : (१) पितृस्थानीय, (२) मातृस्थानीय, (३) मातृ-पितृस्थानीय, (४) मातुलस्थानीय आणि (५) नूतन-स्थानीय. या पाच प्रकारांचे थोडक्यात विवेचन खाली केले आहे.




विवाहाचे प्रकार : पति-पत्नीच्या परस्परांशी असलेल्या संख्येच्या आधारावर दोन विवाहप्रकार संभवतात : एकविवाह (एकपत्नीकत्व) व बहुपतिपत्नीक्तव. एकविवाह म्हणजे एका व्यक्तीस एकावेळी फक्त एकाच जोडीदाराशी विवाहबद्ध होता येते. आधुनिक समाजाचा कल हा एकविवाह पद्धतीकडे असल्याचे दिसते. काही आदिवासी जमातींमध्येही हा विवाहप्रकार रुढ आहे. मर्‌डॉक याने केलेल्या अध्ययनात अशा जमातींची संख्या त्रेचाळीस असल्याचे आढळून आले.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 15:34 ( 1 year ago) 5 Answer 5889 +22