वर्ल्ड बँकेचे खरे नाव काय?www.marathihelp.com

वर्ल्ड बँकेचे खरे नाव काय?

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अनेक देशांच्या अर्थव्यवस्थाचे खूप नुकसान झाले. जागतिक व्यापार पूर्णतः अस्ताव्यस्त झालेला होता. म्हणून जागतिक बाजारपेठांची पुनर्रचना व विविध देशांच्या अर्थव्यवस्थांचा योजनाबद्ध विकास करण्याची गरज भासू लागली. जागतिक बँक world bank स्थापनेतील हे पहिले पाऊल म्हणावे लागेल.

ब्रेटनवुड्स परिषदेत या अर्थव्यवस्थांच्या पुनर्बांधणीसाठी आणि विकासासाठी इंटरनॅशनल बँक फॉर रीकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट (IBRD) ची स्थापना करण्यात आली. या बँकेलाच जागतिक बँक म्हणून ओळखले जाऊ लागले.

नंतर 1960 मध्ये International Development Association (IDA) ची स्थापना झाली. सध्या या दोन्ही बँकांना किंवा संस्थांना एकत्रित रित्या जागतिक बँक असे म्हणतात.

इंटरनॅशनल बँक फॉर रीकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट (IBRD) – 31 डिसेंबर 1945 रोजी इंटरनॅशनल बँक फॉर रीकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट (IBRD) ची स्थापना झाली. IMF चे सदस्यत्व मिळाल्यावर आपोआप आयबीआरडी चे सदस्यत्व मिळते.

IBRD चे मुख्य कार्य पुनर्बांधणी व विकासासाठी दीर्घकालीन कर्जपुरवठा करणे हे आहे. IBRD मध्यम उत्पन्न देश व कर्ज फेडू शकणाऱ्या कमी उत्पन्न देशांनाच कर्ज देते. कर्ज हे पुनर्बांधणी व विकासासाठीच वापरले आहे का हे तपासले जाते.

solved 5
बैंकिंग Friday 9th Dec 2022 : 11:30 ( 1 year ago) 5 Answer 7001 +22