लहान मुलांचे संगोपन संवर्धन करताना काय काय करावे लागते?www.marathihelp.com

संगोपनकर्त्यांयनी लहान मुलांना सतत नवनवीन वस्तू पहायला, ऐकायला, खेळायला व हाताळायला देवून त्यांरना वेगाने शिकण्यास व समजून घेण्यारस मदत करावी. लहान मुलांना फार काळ एकटे सोडू नये. अशाने त्यांची शारीरिक व मानसिक वाढ खुंटते. मुलींना मुलांइतकेच जेवण लागते व मुलांइतकीच त्यांनादेखील प्रेमाची, वात्सल्याची गरज असते.

पालक व संगोपनकर्त्‍यांस सल्ला:

मुलाशी शक्य तितका वेळ बोला, खेळा, त्याला वस्तू बोटाने दाखवून नावे सांगा.
जेवणाच्या वेळी सर्व कुटुबियांसमवेत गप्‍पांना प्रोत्‍साहन द्या.
मुलाची वाढ मंद असल्यास किंवा त्यास काही शारीरिक अपंगत्व असल्यास त्याला ज्या गोष्टी व्यवस्थित करता येतात त्यांचेवर अधिक भर द्या. त्यास अधिक उत्तेजन द्या व त्याच्या बरोबर जास्त वेळ घालवा.
मुलास एकाच स्थितीत जास्‍त तास वेळ ठेऊ नका.
अपघात टाळण्यासाठी परिसर सुरक्षित ठेवा.
त्याचे स्तनपान सुरू ठेवा, त्यास गरजेनुसार विविध प्रकारचे अन्न द्या
मुलाला वाटी-चमच्याने स्वतः खाण्यासाठी मदत करा.
मुलाचे लसीकरण पूर्णपणे झाल्याची खात्री करा व शिफारस केल्यानुसार पूरक सूक्ष्मपोषके मिळाली आहेत याकडे लक्ष द्या.

मुलाचे बोलणे नीट ऐका
मुलाशी सतत संवाद ठेवा.
मूल बोलताना अडखळत असल्यास, त्यास सावकाश बोलायला सांगा.
गोष्टी वाचा, सांगा.
त्याला खेळण्यास व कुतूहल जागृत ठेवण्यास उद्युक्त करा.

solved 5
General Knowledge Saturday 15th Oct 2022 : 08:58 ( 1 year ago) 5 Answer 923 +22