राज्यशास्त्र या विषयाला शास्त्रीय रूप देणारा पहिला विचारवंत कोण?www.marathihelp.com

राज्यशास्त्र :
सत्ताविषयक शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र होय. विशिष्ट भूप्रदेशात निवास करणाऱ्या सर्व समाजावर आणि समाजातील सर्व संस्थांवर प्रभाव असलेली शक्ती म्हणजे सत्ता होय. ही शक्ती कर्तव्य ठरवते, निषेध पाळावयास लावते कर्तव्ये न पाळल्यास किंवा निषेध न मानल्यास देहदंड, धनदंड इ. दंड करते आणि निषिद्ध वर्तनास प्रतिबंध करते. यासच राजकीय सत्ता म्हणतात. समाजातील व्यक्ती, गट आणि सर्व समाज यांची भूमी व जीवितरक्षण करणारी सुव्यवस्था तिच्याने उत्पन्न होते आणि स्थिरावते, तसेच सुव्यवस्थेस धोका उत्पन्न झाल्यास तो नष्ट करते वा तसा धोका उत्पन्न होऊ देत नाही, ती राजकीय सत्ता होय. समाजसंबंधी सत्तेच वास्तव व्यवहार कसा चालतो, त्या व्यवहाराचे प्रकार किती असतात, म्हणजे संघटना किती प्रकारच्या असतात, सत्ता कोण व्यक्तिशः व समूहशः कशी काबीज करतात, विस्तारतात वा गमावतात म्हणजे ती सत्ता कशी उत्पन्न होते, वाढते व घटते त्याचप्रमाणे ती युक्त आणि कल्याणकारक कशी असते वा असावी किंवा तशी नसते इ. गोष्टींचा विचार राजकीय तत्त्वज्ञानात आणि राजकीय विज्ञानात असतो. सामाजिक आदर्शांचा व ध्येयवादांचा ऊहापोह वस्तुवादाशी निगडित असतो म्हणून राजकीय तत्त्वज्ञानात विज्ञानदेखील ग्रथित केलेले असते. सत्तेचे वरिष्ठ वा अंतिम अधिष्ठान म्हणजे सार्वभौमत्व, सत्तेची युक्तता वा न्याय्यता (लिजिटिमसी) सनदशीर म्हणजे संविधानसहित सत्ता, सत्तारहित म्हणजे अराजक आणि सत्तायुक्त समाज, निसर्गातील दैवी किंवा धार्मिक पावित्र्य आणि सत्ता यांचा संबंध, शुद्ध नैतिक सामाजिक जीवन आणि सत्तेचा व्यवहार, समाजरचनेचे विविध प्रकार आणि त्यांची कार्ये यांचा सत्तेशी असलेला संबंध, राज्य हा सत्तेचा विकसित आविष्कार व त्या आविष्काराचे प्रकार, या आविष्कारांवाचून अस्तित्त्वात असलेले मागासलेले समाज आणि आदर्श अराजक स्थिती, एकात्मक केंद्रराज्य आणि संघराज्य यांच्यातील वैशिष्ट्ये आंतरराष्ट्रीय संबध, युद्धसंस्था इ. विषयांचा राजकीय तत्त्वज्ञान व राजकीय विज्ञान यामध्ये सोपपत्तिक ऊहापोह असतो. सनदशीर म्हणजे संविधानाशी संबद्ध सत्ता. कायद्याचे शासन, एक किंवा अनेक सत्ताधाऱ्यांचे मनमानी शासन, विशेषतः राजकीय ध्येयवाद उदा., लोकशाही, राष्ट्रवाद, समाजवाद, साम्यवाद, मानवी मूलभूत हक्क, राजसत्ता, बेबंदशाही (दुरवस्था) आणि तिची कारणे यांचे अध्ययन राज्यशास्त्रांत करावयाचे असते. धार्मिक शासन आणि इहवादी शासन यांच्या संबंधाची मीमांसाही राज्यशास्त्रात विस्ताराने केलेली असते. कित्येक वेळा धर्मसंस्था ऐहिक शासन चालवीत असते. कित्येक वेळा ऐहिक शासन धर्मसंस्थेच्या प्रभावाखाली असते. कित्येकदा धार्मिक सत्ता आणि ऐहिक सत्ता यांच्यात समन्वय वा समतोल असतो. कित्येकदा ऐहिक शासनच वरिष्ठ दैवी शक्तिचे पाठबळ मिळालेले मानले जाते. वैज्ञानिक व औद्योगिक क्रांतीनंतरच्या आधुनिक युगात गेल्या दोनशे-अडीचशे वर्षांत इहवादी राज्ये शासन करू लागली आहेत. या सर्व मुद्यांचा राज्यशास्त्रात ऊहापोह असतो.

solved 5
General Knowledge Saturday 15th Oct 2022 : 09:21 ( 1 year ago) 5 Answer 992 +22