युरोप खंडाच्या इतिहासाचा अभ्यास करीत असताना मध्ययुगीन कालखंडात चा प्रारंभ किती साली झाला?www.marathihelp.com

मध्ययुग, यूरोपीय : इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून पंधराव्या शतकाच्या अखेरपर्यंत सु. एक हजार वर्षाच्या कालखंडाला यूरोपीय इतिहासात मध्ययुग ही संज्ञा दिली जाते.

मध्ययुग, यूरोपीय : इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून पंधराव्या शतकाच्या अखेरपर्यंत सु. एक हजार वर्षाच्या कालखंडाला यूरोपीय इतिहासात मध्ययुग ही संज्ञा दिली जाते. इ.स.४७६ मध्ये पश्चिम रोमन साम्राज्याचा अंत झाला आणि इ.स.१४५३ मध्ये कॉन्स्टँटिनोपलचे पतन झाले व पूर्व रोमन साम्राज्याही संपुष्टात आले. या दोन्ही घटनांचे यूरोपवर महत्वाचे व दूरगामी परिणाम झाले. पहिलीने मध्ययुगाचा प्रारंभ व दुसरीने त्याचा अंत झाला, असे इतिहासकार मानतात. 

मध्ययुग ही संज्ञा प्रबोधनकालीन लेखकांनी रूढ केली. रोमन साम्राज्यांनंतरचा सु. हजार वर्षाचा इतिहास प्रबोधनकाली विशेष ज्ञात नसल्याने मध्ययुगाला तमोयुग असेही म्हटले जाते.

इ.स.पाचव्या शतकाच्या अखेरीस भूमध्य समुद्राच्या परिसरातील ग्रीस, इटली इ. देशाचे महत्व कमी होऊन तीन नवीन संस्कृतिकेंद्रे विकसित झाली. पहिले कॉन्स्टँटिनोपलचे पूर्व रोमन साम्राज्य. यालाच ⇨वायझंटिन साम्राज्य म्हणतात. या भागात प्राचीन ग्रीक-रोमन संस्कृतीचा प्रभाव विशेष घटला नाही. दुसरे इस्लामच्या उदयाने अरबस्तानात निर्माण झाले व नंतर भारत, उत्तर आफ्रिका, स्पेन इ. भागांत त्याचा प्रभाव पडला. तिसरे केंद्र इटली व फ्रान्समध्ये रोमन साम्राज्याचा विध्वंस करणाऱ्या गॉल टोळ्यांच्या प्रयत्नाने उदयास आले व कालांतराने याचा प्रभाव सर्व यूरोपभर पडला. मध्ययुगीन यूरोपचा इतिहास प्रामुख्याने या तिसऱ्या केंद्राच्या प्रभावाने घडला. इ.स.५०० ते १००० या पाचशे वर्षात या नव्या संस्कृतीची वीजे यूरोपात रूजली व पुढील पाचशे वर्षात यांच्या शाखआ विस्तारल्या.

राजकीय स्थित्यंतरे : रोमन साम्राज्य व ख्रिस्ती धर्म या दोन संघटनांद्वारे प्राचीन काळी यूरोपीय ऐक्य साधण्याचे प्रयत्न झाले. परंतु दळणवळण व वाहतूक साधनांच्या अभावामुळे अतिविस्तारलेल्या साम्राज्याचे शासन चालविणे कठीण झाल्याने पूर्व व पश्चिम असे साम्राज्याचे दोन भाग पडले. काँन्स्टँटिनोपलचे ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्च व रोमचे रोमन कॅथलिक अशी दोन पीठे निर्माण झाली. तरीही धार्मिक व राजकीय एकतेचे उद्दिष्ट दृष्टीआड झाले नाही.

रानटी टोळ्यांशी झगडता झगडता इ.स.४७६ मध्ये पश्चिम रोमन साम्राज्य नष्ट झाले. तथापि रोमन साम्राज्याच्या एकतेचे कार्य पुढे चालविण्याची जबाबदारी बायझंटिन साम्राज्याला पेलता न आल्याने पश्चिम साम्राज्याची प्रतिष्ठा त्याला केव्हाच लाभली नाही.साहजिकच यूरोपच्या राजकीय जीवनात निर्माण झालेली पोकळी काही शतके भरून निघाली नाही.

रोमन साम्राज्यांच्या पतनानंतर तीन शतके यूरोपभर अंगल्स, सॅक्सन, ज्यूट, ऑस्ट्रोगॉथ, व्हिसीगॉथ, फ्रँक, हूण इ. टोळ्या निरनिराळ्या भागांत आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यात गुंतल्या होत्या . या टोळ्यांत सतत संघर्ष चालू होते. या संघर्षामुळे सामान्य जनांच्या जीवितवित्तास सुरक्षितता राहिली नव्हती. त्यामुळे मध्ययुगाचे वर्णन करणाऱ्या लेखकांपुढे बेबंदशाहीचा कालखंड उभा राहतो. ह्या अराजकाचा फायदा अरब, तुर्क इ. इस्लामी जमातींना मिळून त्यांचे साम्राज्य उत्तर आफ्रिकेत व स्पेनमध्ये पसरले. मध्य यूरोपात स्लाव्ह टोळ्यांनी आपले बस्तान बसविले. पश्चिम यूरोपीय देशांत फ्रँक टोळीने आपले आसन स्थिर केले. उत्तर इटलीत लोंबार्ड टोळीचे बस्तान बसले. तर अँगल्स, सॅक्सन, ज्यूट इ.टोळ्यानी इंग्लंड काबीज केले. स्कॉटलंड, आयर्लंड ,वेल्स यांत मूळच्या केस्ट जमातीचे वर्चस्व राहिले.

वरील टोळ्यांपैकी फ्रँक टोळीचे वर्चस्व वाढले व त्यांचा नेता क्लोव्हिस (कार. ४८१-५११) याने गॉलमध्ये (फ्रान्स) एक प्रबल राज्य स्थापन केले. पंचवीस वर्षाच्या कारकीर्दीत क्लोव्हिसच्या राज्याची सरहद्द र्हाकईन नदीपलीकडे गेली. याच्याच कारकीर्दीत फ्रँक टोळीने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. क्लोव्हिसचे वारस दुर्बल निघाल्याने खरी सत्ता कर्तबगार मंत्र्यांच्या हाती गेली. या मंत्र्यापैकी शार्ल मार्तेल (कार.७१४-७४१) याने इ.स. ७३२ मध्ये तूरच्या लढाईत भूर लोकांचा पराभव करून यूरोपवरील इस्लामी आक्रमणास पायबंद घातला. पुढे शार्ल मार्तेलचा मुलगा पेपिन द शॉर्ट (कार.७१४-६८) याने क्लोव्हिसच्या वंशजांना (मेरोव्हिंजिअन वंश) बाजूस सारून गॉलचे राज्य बळकावले. ही क्रांती पोपच्या अनुमतीने झाली. पेपिननेही धर्मगूरू म्हणून पोपच्या अधिकारास मान्यता दिली व लोंबार्ड टोळ्यांविरूध्द पोपला लष्करी साहाय्य देऊन मध्य इटलीत पोपचे राज्य स्थापण्यात यश मिळविले. साहजिकच पेपिन व त्याचे वारस यांना धर्मपीठाचा पाठिंबा मिळाला व पेपिनच्या कॅरोलिंजिअन वंशाची प्रतिष्ठा वाढली.

solved 5
ऐतिहासिक Wednesday 7th Dec 2022 : 13:00 ( 1 year ago) 5 Answer 5681 +22