मोरगेज म्हणजे काय?www.marathihelp.com

मोरगेज (मॉर्गेज) (Mortgage Loan) म्हणजे काय?

मॉर्गेज लोन म्हणजे अगदी सहजसोप्या भाषेत सांगायचे झाले तर स्वतःच्या मालकीची मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवून त्यासमोर कर्ज घेणे. त्या कर्जाची परतफेड होईपर्यंत त्या मालमत्तेची सगळी कागदपत्रे ही बँकेकडे जमा राहतात. बँकेने दिलेल्या कर्जाची योग्य वेळेत परतफेड न केल्यास किंवा कर्जदाराने कर्जाची परतफेड करण्यास नकार दिल्यास बँकेला त्या मालमत्तेवर जप्ती आणण्याचा अधिकार असतो. त्या मालमत्तेवर जप्ती आणून शिल्लक राहिलेले कर्ज बँक वसूल करून घेऊ शकते.


मॉर्गेज लोनची वैशिष्ट्ये – Features of Mortgage Loan

१. मॉर्गेज लोनमध्ये जो व्याजदर आकारला जातो तो बाकी लोन्सच्या तुलनेत खूप कमी असतो.

२. तुम्ही व्याजदराच्या अनेक पर्यायांमधून एक प्रकार निवडू शकतात. ते पर्याय म्हणजे Floating व्याजदर, Fixed व्याजदर, व्याजदर-फक्त मॉर्गेज आणि Payment Option ARMs, रजिस्ट्री मॉर्गेज लोन, Condition Sale Mortgage Loan, Usufructuary Mortgage, इत्यादी.

३. मॉर्गेज लोन हा एक गृहकर्ज मिळवण्याचा सोपा पर्याय आहे. तुमच्या कर्जाची परतफेड झाल्यावर तुम्हाला त्या घराचा मालकी हक्क देखील मिळू शकतो.

४. मॉर्गेज लोनचे कर्ज ते किंमत यामधले प्रमाण हे सर्वसाधारणपणे ६० ते ७०% एवढे आहे.

५. कर्ज देणारे मॉर्गेज लोन हे त्या मालमतेची मार्केटमधील किंमत किंवा त्या मालमत्तेची नोंदवलेली किंमत यापैकी जी लहान असेल त्यावर देतात.

६. तुम्ही मॉर्गेज लोन हे अनेक प्रकारच्या मालमत्तेवर घेऊ शकतात. जसं की बांधकामाधीन जागा, बांधकाम पूर्ण झालेली जागा, स्वतःच्या मालकीची निवासी किंवा व्यावसायिक जागा, इत्यादी. फक्त ज्या जागेवर तुम्ही कर्ज घेत आहात त्या जागेचा मालकी हक्क कायद्याने आणि कागदपत्रांनुसार तुमच्याकडे पाहिजे आणि त्या जागेच्या बाबतीत कायदेशीररित्या कोणत्याही तक्रारी किंवा कोर्ट केस चालू नसली पाहिजे.

७. मॉर्गेज लोन हे जास्त कालावधीसाठी उपलब्ध असते. 

८. बाकी लोन्सच्या तुलनेत जागेवरती जास्त रक्कमेचे मॉर्गेज लोन मिळू शकते.

९. जागेची निवड ही अट मॉर्गेज लोनमध्ये नाही आहे. जागेची निवड करण्याआधी देखील तुम्हाला मॉर्गेज लोन हे मिळू शकते.

१०. तुम्ही कर्जाची रक्कम तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक गरजांसाठी वापरू शकता.

११. जर तुम्ही स्वयंरोजगार असाल तर तुमच्या योग्यता आणि पात्रतेप्रमाणे तुम्हाला वेगवेगळे पर्याय देखील उपलब्ध होऊ शकतात.




मॉर्गेज लोनचे प्रकार – Types of Mortgage Loan

१. Fixed मॉर्गेज लोन व्याजदर– या प्रकारामध्ये तुमचा कर्जावर भरावयाचा व्याजदर हा परतफेडीचा कालावधी संपेपर्यंत सारखाच असतो. याउलट जर तुम्ही Linear पेमेंटचा पर्याय निवडला तर दरमहा हफ्ता हा कमी कमी होत जातो. 

२. Adjustable व्याजदर मॉर्गेज– या मॉर्गेज लोनच्या प्रकारात व्याजदर हा सारखा बदलत असतो. काही कालावधीसाठी हा व्याजदर सारखा असतो पण काही कालावधीनंतर त्या व्याजदरात बदल होतो. व्याजदरामधील बदल हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बदलत्या धोरणांवरती अवलंबून असतो.

३. व्याजदर- फक्त मॉर्गेज– या प्रकारामध्ये मॉर्गेज लोनवर आकारला जाणारा शिवाय ठरवलेला असा व्याजदर फक्त ठरलेल्या कालावधीमध्ये बँकेकडे भरला जातो. या लोनचा ठरलेला कालावधी संपल्यानंतर शेवटी मुद्दलाचे पैसे बँकेकडे जमा केले जातात.

४. रजिस्ट्री मॉर्गेज लोन– या प्रकारामध्ये सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून एक agreement बनवण्यात येते व त्याची कायदेशीररित्या रजिस्ट्रीमध्ये नोंद करण्यात येते. जर तुम्ही तुमच्या कर्जाची परतफेड योग्य त्या कालावधीमध्ये पूर्ण केलीत तर तुम्हाला तुमची मालमत्ता तुमच्या मालकी हक्कासह परत करण्यात येते. 

५. कंडिशन सेल मॉर्गेज लोन– या प्रकारामध्ये कर्ज परतफेडीची एक तारीख ठरवली जाते आणि त्या वेळात जर कर्जाची परतफेड झाली नाही तर बँकेकडे ती मालमत्ता विकण्याचा अधिकार असतो. या प्रकारामध्ये कर्ज देतानाच ही अट कर्जदाराला सांगितली जाते.

६.Usufructuary Mortgage– या प्रकारामध्ये जी मालमत्ता मॉर्गेज करायची आहे त्याचा मालकी हक्क हा ज्याच्याकडून आपण कर्ज घेत आहोत त्याला दिला जात नाही. तर या प्रकारामध्ये कर्जदार त्याची जागा ज्यांना भाड्याने देत आहे, ते भाडे त्याच्या ऐवजी ज्या व्यक्तीकडून त्याने कर्ज घेतले आहे त्याला द्यायला सांगितले जाते.

solved 5
General Knowledge Tuesday 13th Dec 2022 : 09:47 ( 1 year ago) 5 Answer 7964 +22