मूलभूत शिक्षणाचे प्रवर्तक कोण?www.marathihelp.com

आधुनिक शिक्षणाचा विकास हा या प्रक्रियेचा एक भाग होता. इंग्रजांबरोबर हे आधुनिक शिक्षण भारतात, पर्यायाने महाराष्ट्रातही आले. आपल्याकडे आधुनिक शिक्षणाचा जो प्रसार झाला त्यामध्ये चार प्रवाह ठळकपणे दिसून येतात. एक म्हणजे इंग्रजांनी स्वतः शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे स्थापन करून पाश्‍चात्त्य पद्धतीचे शिक्षण सुरू केले. त्याचप्रमाणे, धर्मप्रसाराच्या हेतूने आलेल्या मिशनऱ्यांनीही इथे शिक्षणसंस्था निर्माण केल्या. इंग्रजांनी जी शिक्षणपद्धती रूढ केली होती ती मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीवर आधारलेली होती. ही पद्धत पूर्णतः पुस्तकी शिक्षणावर आधारित होती. इथल्या संस्कृतीत वाढलेल्या इथल्या रक्ताच्या माणसांना पाश्‍चात्त्य शिक्षण देऊन नोकरशाहीला आवश्यक वर्ग निर्माण करण्याचं उद्दिष्ट त्यामध्ये होते. त्यात कोणतीही सामाजिक उद्दिष्टे नव्हती. आपल्या लोकांनीही पाश्‍चात्त्य शिक्षण हे परिवर्तनाचे साधन मानले. पुस्तक हे जर ज्ञानाचे माध्यम असेल आणि त्यातून पाश्चात्य ज्ञान मिळत असेल, तर पुस्तकी शिक्षण योग्यच आहे, असा विचार पुढे आला. मेकॉलेच्या तत्त्वाप्रमाणे पुस्तकाचा सांधा फक्त शिक्षणाशी लावला गेला, समाजाशी किंवा व्यवहाराशी नाही. असे असले तरी देशातील सर्वाधिक विद्वान आणि देशप्रेमी समर्थ व्यक्ती या मेकॉलेच्या शिक्षणानेच निर्माण केल्या.

दुसरा महत्त्वाचा प्रवाह म्हणजे आपल्या लोकांनी निर्माण केलेल्या संस्था. इंग्रजांच्या संस्थांना पर्याय उपलब्ध व्हावा, आपल्या संस्कृतीचे जतन होईल अशा पद्धतीने शिक्षण द्यावे, तसंच अधिकाधिक लोकांपर्यंत शिक्षण पोहोचून विकास व्हावा, या हेतूंनी आपल्याकडच्या काही समाजधुरीणांनी शाळा-महाविद्यालये स्थापन केली.

तिसरा मोठा प्रवाह निर्माण केला तो महात्मा फुले यांनी. पुढे शाहू महाराजांनी त्याचा विस्तार केला. शिक्षण ही फक्त वरच्या वर्गाची मक्तेदारी न राहता जनसामान्यांपर्यंत ते पोहोचले पाहिजे, हा विचार या तिसऱ्या प्रवाहामध्ये होता. शिक्षण बहुजनांपर्यंत पोहोचवण्यासाठी, शिक्षणाच्या प्रवाहात स्त्रियांना व वंचितांना सहभागी करून घेण्यासाठी, तसेच समाजात शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी या मंडळींनी चांगले प्रयत्‍न केले. त्यांनी जिल्ह्या-जिल्ह्यांत प्राथमिक-माध्यमिक शाळा काढल्या. अर्थात या दोन्ही प्रवाहांचा गाभा पाश्चात्त्य शिक्षण हाच होता.

चौथा प्रवाह होता तो मूलभूत शिक्षणाचा. गांधीजी या प्रवाहाचे प्रणेते होते. शिक्षणाचा आणि राष्ट्रीय विकासाच्या चळवळीचा परस्परसंबंध असायला हवा, हा गांधीजींचा विचार यामागे होता. शिक्षणाचा प्रत्यक्ष कामाशी आणि तंत्रज्ञानाशी सांधा असायला हवा, या भूमिकेतून गांधीजींनी याला ‘नई तालीम’ असे म्हटले होते. पाश्‍चात्त्यांच्या शिक्षणाच्या पद्धतीला खऱ्या अर्थाने पर्याय देणारा हा नवा ढाचा होता. मात्र, हा प्रवाह फारसा वाढला नाही. स्वातंत्र्योत्तर काळातही या प्रवाहाला फारसे बळ मिळाले नाही.

मराठी साम्राज्यपुर्व शिक्षण व्यवस्था
मराठी साम्राज्याची शिक्षण व्यवस्था
ब्रिटिशकालीन
मध्य प्रांत, विदर्भ आणि निजामकालीन मराठवाडा
महाराष्ट्र राज्य स्थापना काळातील बदल


solved 5
शिक्षात्मक Monday 10th Oct 2022 : 17:29 ( 1 year ago) 5 Answer 222 +22