महाराष्ट्रात किमान किती लोकसंख्या असलेल्या शहरासाठी महानगरपालिका स्थापन केली जाते?www.marathihelp.com

3 लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी भागात महानगरपालिका अस्तित्वात येऊ शकते.

महानगरपालिकेच्या निवडणुका दर पाच वर्षानी होतात. महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या सदस्यापैकी एक महापौर
तर एक उपमहापौर निवडला जातो.

महापौराचा कालावधी 2.5 वर्षाचा असतो.

महानगर पालिकेतील निवडून आलेल्या सदस्यांना ‘नगरसेवक’ म्हणतात.

महापौरास शहरातील प्रथम नागरिक असे संबोधतात.

महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख महानगरपालिका आयुक्त असतो.

आयुक्त हा भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ सनदी अधिकारी असतो.

महानगरपालिका आयुक्ताची नेमणूक राज्यसरकार तीन वर्षासाठी करते.

महानगरपालिकेचे अंदाजपत्रक महानगरपालिका आयुक्त तयार करतो.

महानगरपालिकेच्या बैठकांना हजर राहण्याचा अधिकार आयुक्तांना असतो.

सध्या महाराष्ट्रात 26 महानगरपालिका आहेत.

पिंपरी चिंचवड ही महानगरपालिका देशातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिका गणली जाते.

solved 5
राजनीतिक Tuesday 11th Oct 2022 : 11:34 ( 1 year ago) 5 Answer 359 +22