महाराष्ट्राच्या लाचलुचपत विभागाच्या पोलीस महासंचालकांचे नाव काय?www.marathihelp.com

महाराष्ट्राच्या लाचलुचपत विभागाच्या पोलीस महासंचालकांचे नाव काय?
प्रभात कुमार (भापोसे), (अतिरिक्त कार्यभार), महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य.


लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , महाराष्ट्र राज्य हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा विभाग आहे. भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कारभार हे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे. तेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ध्येय आहे.

शासन नागरिकांना अनेक सेवा पुरवित आहे. जर कोणत्याही शासकीय कामाकरीता शासकीय लोकसेवकांनी लाचेची मागणी केली तर नागरिकांनी ला.प्र.वि. शी संपर्क साधावा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सदैव अशा नागरिकांच्या बाजुने ठामपणे उभे राहिल आणि लाचखोरांविरूद्ध कारवाई करेल. भ्रष्टाचार मुक्त समाज राज्याला प्रगती, समृद्धी आणि सुशासनाच्या युगामध्ये घेऊन जाईल. हे केवळ नागरिकांच्या सक्रिय सहभागाने व सहकार्यानेच शक्य होऊ शकेल.

समाजाला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी व विकासाला गती देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सहकार्य करा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग प्रत्येक ठिकाणी आपल्या मदतसाठी सज्ज आहे.

solved 5
General Knowledge Saturday 10th Dec 2022 : 11:44 ( 1 year ago) 5 Answer 7455 +22