महाराष्ट्र विधान परिषद कुठे आहे?www.marathihelp.com

महाराष्ट्र राज्यात विधान परिषद आहे. विधानसभेचे कामकाज मुंबई येथून चालते.
महाराष्ट्र विधानसभा हे महाराष्ट्र शासनाच्या द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळामधील कनिष्ठ सभागृह आहे (महाराष्ट्र विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह).

विधानसभेची विद्यमान सदस्य संख्या २८८ आहे. महाराष्ट्रात शिवसेना व भाजप यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्तित्वात आहे.

महाराष्ट्र विधान परिषद हे महाराष्ट्र राज्याच्या द्विगृही कायदेमंडळापैकी वरिष्ठ गृह आहे.

महाराष्ट्राच्या विधानपरीषदेत ७८ सदस्य आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या ६ घटक राज्यात द्विगृही कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात असून तेथे विधान परिषद अस्तित्वात आहेत. बाकी सर्व घटकराज्यात एकगृह कायदेमंडळ पद्धती आहे. तेथे विधानसभा हे एकच सभागृह आहे.[१] राज्यघटनेच्या कलम १६९ (१) नुसार विधानसभेने सभासदांच्या किंवा दोन तृतीयांश सभासदांनी उपस्थितीने बहुमताने ठराव केल्यास भारतीय संसद राज्यात विधान परिषद अस्तित्वात आणते. विधान परिषदेची सदस्य संख्या किती असावी, हे राज्यघटनेने निश्चित केलेले नाही. कलम १७१ नुसार विधान परिषदेत किमान ४० सभासद किंवा विधानसभेच्या एकूण सभासद संख्येच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त सदस्य नसतात. विधान परिषद तत्त्वत: वरिष्ठ सभागृह असले तरी व्यवहारात ते कनिष्ठ सभागृह आहे. या सभागृहाला सर्वच बाबीत कमी अधिकार आहेत

solved 5
General Knowledge Tuesday 11th Oct 2022 : 11:34 ( 1 year ago) 5 Answer 350 +22