महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत 2021?www.marathihelp.com

महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी यांची नियुक्ती करण्यात आली

भगत सिंह कोश्यारी (७७) यांचा जन्म १७ जून १९४२ रोजी झाला. उत्तरखंड राज्यात भाजपचे सदस्य ते राष्ट्रीय उपाध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. उत्तराखंडमधील भाजपचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेले आहे. २००१ ते २००२मध्ये त्यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून त्या राज्याचा कारभार केला. सन २००२ पासून २००७ पर्यंत उत्तराखंड विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. सन २००८ ते २०१४ पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते. भगत सिंह कोश्यारी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. सन १९७७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेल्या आणीबाणीच्या निर्णयाविरोधातील आंदोलनात त्यांनी तुरुंगवासही भोगलेला आहे.

solved 5
राजनीतिक Tuesday 11th Oct 2022 : 11:47 ( 1 year ago) 5 Answer 467 +22