मराठी भाषेतील पहिला कवी कोण?www.marathihelp.com

मराठी भाषेतील पहिला कवी कोण?

मराठी साहित्य : प्रास्ताविक: या लेखात मराठी साहित्याच्या प्रारंभापासून साधारणपणे १९८० पर्यंतचा आढावा घेतलेला आहे. या आढाव्यात ‘प्राचीन मराठी साहित्य’ असा पूर्वविभाग असून, त्यात प्रारंभापासून इ.स. सु. १८१८ पर्यंतच्या मराठी साहित्याचे विवेचन केलेले आहे. लेखाच्या दुसऱ्यात भागात अर्वाचीन मराठी साहित्याचा आढावा घेतलेला आहे. त्यात काव्य, नाटक, कादंबरी , कथा, विनोद, लघुनिबंध, प्रवासवर्णने, बालसाहित्य चरित्रे-आत्मचरित्रे, निबंध, समीक्षा, व्याकरणग्रंथ, संधोधनपर (वाङ्मयीन) साहित्य, इतिहासलेखन, शास्त्रीय साहित्य अशा उपविषयांखाली वेगवेगळ्या लेखकांनी, त्या त्या प्रकारातील वाङ्मयाचा परामर्श घेतला आहे. बृहन्महाराष्ट्रातील साहित्यसंस्था असाही एक उपविषय त्यानंतर घेतलेला आहे. ‘दलित साहित्य’ अशी स्वतंत्र नोंद असून जिज्ञासूंना ती विश्वकोशाच्या सातव्या खंडात पाहता येईल. ‘लोकसाहित्य’ अशी विश्वकोशात स्वतंत्र नोंद असून त्या नोंदीत मराठी लोकसाहित्याचा आढावा जिज्ञासूंना पाहावयास मिळेल. काव्य, नाटक, कादंबरी आदी प्रमुख साहित्यप्रकारांबरोबरच शास्त्रीय वाङ्मय, इतिहासवाङ्मय, व्याकरणग्रंथ यांसारखी मराठी वाङ्मयाची इतरही काही क्षेत्रे वाचकांनी परिचित व्हावीत, या दृष्टीने या लेखाची मांडणी केलेली आहे. विश्वकोशात काव्य, नाटक, कादंबरी, कथा, विनोद यांसारख्या साहित्यप्रकारांवर स्वतंत्र नोंदी अकारविल्हे यथास्थळ दिलेल्या असून ह्या साहित्याप्रकारांच्या घाटांसंबंधीचे विवेचन, तसेच त्याच्याशी संबंधित असे, मराठी साहित्यातील योग्य ते निर्देश अशा नोंदीतून जिज्ञासू वाचकाला पहावयास मिळतील. ज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवत यांसारख्या महत्वाच्या रचनांवरही स्वतंत्र नोंदी यथास्थळ दिलेल्या आहेत. मराठी वाङ्मयासंबंधीची-विशेषत: लेखक आणि साहित्यकृती यांसंबंधीची अधिक माहिती, जिज्ञासूंना या प्रकारच्या स्वतंत्र नोंदीत, उपलब्ध होऊ शकेल. महत्वाच्या सर्व प्राचीन-अर्वाचीन लेखकांवर विश्वकोशात असलेल्या स्वतंत्र नोंदी, अकारविल्हे त्या त्या खंडात पहावयास मिळतील. उदा., ज्ञानेश्वर, तुकाराम, केशवसुत, मर्ढेकर यांसारखे कवी किर्लोस्कर, देवल, गडकरी, विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर इ. नाटककार ह.ना.आपटे, ना.सी.फडके , वि.स. खांडेक, विश्राम बेडेकर यांसारखे कादंबरीकार त्याचप्रमाणे वेगवेगळे साहित्यप्रकार हाताळणारे महत्वाचे साहित्यिक यांवर स्वतंत्र नोंदी आहेत. महानुभाव, वारकरी यांसारख्या पंथांवरही स्वतंत्र नोंदी आहेत. बखरवाङ्मय, आख्यानक कविता, शाहिरी वाङ्मय, लावणी, पोवाडा यांसारख्या खास मराठी अशा विषयांवरही स्वतंत्र नोंदी विश्वकोशात यथास्थळ दिल्या आहेत. काव्यनाटकादी महत्वाचे साहित्यप्रकार स्वच्छंदतावाद, वास्तववाद यांसारख्याकालवाङ्मयीन संप्रदाय रसिसिद्धात, ध्वनिसिद्धान्त संस्कृत साहित्य शास्त्रातील संकल्पना सौंदर्यशास्त्र, साहित्यसमीक्षा, पाठचिकित्सा तसेच महत्वाचे अन्य वाङ्मयीन विषय (उदा., भावविरेचन, काव्यन्याय इ.), वाङ्मयीन चळवळी (उदा., रविकिरण मंडळ), वाङ्मयीन संस्था (उदा., साहित्य संस्कृति मंडळ, भारतीय ज्ञानपीठ इ.) व संमेलने (उदा., मराठी साहित्य संमेलने) यांवरही विश्वकोशात स्वतंत्र नोंदी आहेत. प्रस्तुत लेखात मराठीतील काही महत्वाच्या ग्रंथांचे निर्देश आलेले आहेतच, त्याशिवाय काही निवडक संदर्भग्रंथ लेखाच्या शेवटी, प्राचीन व अर्वाचीन अशी विभागणी करून दिलेले आहेत.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 13:06 ( 1 year ago) 5 Answer 3941 +22