मराठा प्रशासनाचा पत्रव्यवहार कोण पाहत असे?www.marathihelp.com

छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रशासन व्यवस्था आणि कार्यपद्धती अतिशय प्रभावशाली होती.
राजकारण आणि समाजकारण यांचा योग्य मेळ घालून महाराजांनी कृतीशील व्यवस्थापन स्वराज्यामध्ये लागू केल होत.
महाराजांचे व्यवस्थापन पुढील शब्दात स्पष्ट करता येईल -

१. सरकारी नोकर हे फक्त त्यांच्या योग्यतेवर निवडले जात होते, आणि नोकरीमध्ये कुठेही वंश परंपरेला महत्व दिले गेले नाही.
२. सर्व सरकारी नोकरांना पगार हा पैशांच्या स्वरुपात दिला जात होता. जमीन किंवा जहागीर या स्वरुपात कोणालाही मोबदला दिला जात नसे.
३. सर्व व्यवस्थापनेचे काम विविध खात्यांमध्ये विभागले गेले होते आणि प्रत्येक खात्याचे काम आणि जबाबदारी अतिशय विचारपूर्वक आखली गेली होती.
४. महसूल हा सरकारी महसूल विभागाकडून वसूल केला जी आणि त्यावर महाराजांचे नियमित लक्ष असे.
महसूल हा थेट महसूल विभागाकडे जमा होत असे आणि त्यामध्ये कोणत्याही मध्यस्थीला सहभाग मिळत नसे.
५. धर्म आणि जाती हे मुद्दे कोणत्याही सरकारी नोकरीसाठी विचारात घेतले जात न्हवते. व्यक्तीचे कौशल्य आणि योग्यता या गोष्टींच्या आधारावर व्यक्तीची निवड होत असे.

महाराजांनी कोणालाही जमीन अथवा जहागीर दिली नाही. नोकरीसाठी कुणालाही संधी हि वाशावालीमुळे दिली नाही. एवढेच नाही तर मंत्र्यांना देखील त्याचं पद मरेपर्यंत सांभाळता येईल याची शाश्वती न्हवती.
कोणत्याही मंत्र्याला पदापासून दूर करणे अथवा त्याच्याकडे दुसरे खाते देणे या गोष्टी योग्यतेनुसार ठरत असत.
मंत्रिमंडळ हि संकल्पना महाराजांनी स्वराज्यामध्ये सुरु केली आणि त्यानुसार स्वराज्याचे कामकाज हे ८ विविध विभागांमध्ये वाटले गेले.
अष्टप्रधान मंत्रिमंडळातील खाती खालील प्रमाणे:

१. पेशवा(पंतप्रधान) - prime minister
२. अमात्य (महसूल मंत्री) – revenue minister
३. सचिव (अर्थ मंत्री) – finance minister
४. मंत्री (अंतर्गत कामकाज मंत्री) – minister for interior
५. सेनापती (सैन्य प्रमुख ) – commander in chief
६. सुमंत (परराज्य धोरण मंत्री ) – minister for external affairs
७. न्यायाधीश (कायदा आणि सुव्यवस्था) – chief judge
८. पंडित (धार्मिक व्यवस्था मंत्री) – minister for religious affairs

पेशवा याचं काम इतर सर्व खात्यांवर देखरेख करन हे होत.यामधील पंडित आणि न्यायाधीश वगळता इतर सर्व मंत्र्यांना त्यांना दिलेल्या खात्याच्या जबाबदारी शिवाय सैन्याचा एक भाग म्हणून काम कराव लागत असे.
महाराजांनी अष्टप्रधान मंडळातील ५ खात्याच्या मंत्र्यांना सैनिकी काम दिले होते. सेनापतीला मात्र राजनैतिक प्रशासनामध्ये हस्तक्षेप करू दिला जात नसे. एकूणच महाराजांनी अतिशय कार्यक्षम प्रशासन व्यवस्था लागू केली होती. त्याची कार्य पद्धती समाजाला फायदेशीर अशीच होती. न्याय, प्रशासन, करमणूक आणि इतर सर्व गोष्टी ज्या एक समाज घडवण्यासाठी आणि बांधण्यासाठी गरजेच्या आहेत त्या सर्व महाराजांनी स्वराज्यामध्ये घडवून आणल्या. शिस्तबद्ध प्रशासन घडवले .
आज देशाला अशाच एका प्रशासनाची गरज आहे जिथ मनुष्य सुरक्षित आणि स्वतंत्र म्हणून मन उंच करून जगू शकेल.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 09:37 ( 1 year ago) 5 Answer 5924 +22