भारतातील ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचे संस्थापक कोण होते?www.marathihelp.com

भारतातील ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचे संस्थापक कोण होते?

ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना राणी एलिझाबेथ : प्रथमच्या काळात ३१ डिसेंबर, १६०० साली लंडन येथे झाली. सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीस १५ वर्षांसाठी व्यापारी सनद देण्यात आली होती. तथापि, राजा जेम्स पहिला याने इ.स. १६०९ साली कंपनीस कायमची सनद बहाल केली. भारतात प्रथम पोर्तुगीज, त्यानंतर डच, त्यानंतर इंग्रज व शेवटी फ्रेंच या क्रमाने युरोपियन सत्ता आल्या.
अल्बकुर्क हा पोर्तुगीज सत्तेचा संस्थापक मानला जातो. १५१० मध्ये त्याने विजापूरच्या अदिलशाहकडून गोवा प्रांत जिंकून घेतला. पोर्तुगीजांचा भारतातील पहिला व्हाइसरॉय- डी अल्मेडा, दुसरा व्हाइसरॉय- अल्फान्सो डी अल्बकुर्क. भारतात सर्वात जास्त म्हणजे ४५० वष्रे राहिलेली युरोपियन सत्ता म्हणजे पोर्तुगीज सत्ता होय.
डी अल्मेडा (१५०४ ते १५०९) – भारतातील पोर्तुगीजांचा प्रथम व्हाइसरॉय. याने पोर्तुगीज साम्राज्याच्या विस्तारासाठी ब्ल्यू वॉटर पॉलिसीचा स्वीकार केला. भारतात साम्राज्य विस्तारासाठी, भूप्रदेशावर ताबा घेण्यासाठी सागरावरील प्रमुख केंद्रे ताब्यात घेतली.
अल्बकुर्क (१५०९ ते १५१५) – भारतातील पोर्तुगीजांचा दुसरा व्हाइसरॉय. अल्बकुर्कला भारतातील पोर्तुगीजांच्या साम्राज्याचा संस्थापक म्हणून ओळखले जाते. डॉड वेल नामक इतिहासकाराने अल्बकुर्कची तुलना लॉर्ड क्लाइव्हशी केली आहे.
० ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने भारतात आलेला पहिला वकील- कॅ. हॉकिन्स (१६०९).
० १६१५ मध्ये राजा जेम्सच्या पत्राच्या शिफारशीने सर थॉमस रो हा जहांगीरच्या दरबारी येऊन व्यापारी सवलत मिळविण्यात यशस्वी ठरला.
० पोर्तुगीजच्या राजाकडून इ.स. १६६१ साली आंदण मिळालेले मुंबई बेट राजा चार्ल्सने ईस्ट इंडिया कंपनीस वार्षकि भाडेपट्टीने दिले.
० मोगल बादशहा फारखसिअरकडून इंग्रजांनी १७१७ मध्ये मुक्त व्यापाराचे फर्मान मिळविले.
० कंपनीने हुगळी नदीकाठी तीन खेडय़ांची जागा मिळवून तेथे फोर्ट विल्यम हा किल्ला बांधला. याच खेडय़ाचे पुढे शहरीकरण होऊन कलकत्ता हे नाव पडले.
० जमिनीमाग्रे िहदुस्थानात येणारा पहिला युरोपियन – मार्को पोलो.
० िहदुस्थानात येणारा पहिला इंग्रज – थॉमस स्टिव्हन्सन.
० बंगालमध्ये प्लासीवर विजय मिळवून भारतात सत्तेचा पाया घालणारा- लॉर्ड क्लाइव्ह.
० प्लासीच्या लढाईत सिराजउद्दौलाचा पराभव केला- २३ जून, १७५७.
० फ्रेंच व इंग्रज यांच्या दरम्यानची निर्णायक लढाई, वांदिवॉसची लढाई २२ जानेवारी, १७६० रोजी झाली. फ्रेंच सेनापती काउंट लाली तर इंग्रज सेनापती सर आयर कुट होता. या लढाईने भारतातील फ्रेंच सत्तेचा निर्णायक पराभव झाला.
० बक्सारची लढाई (२२ ऑक्टोबर, १७६४) – या लढाईत मीर कासिम (बंगालचा नवाब), अयोध्येचा नवाब सुजाऊदौला व मोगल बादशहा शहाआलम यांच्या संयुक्त फौजांचा इंग्रजांनी पराभव केला.
वॉरन हेिस्टग (१७७४ ते १७८५) :
वॉरन हेिस्टगला प्रथम गव्हर्नर जनरल संबोधले जाते. वॉरन हेिस्टगने भारतात आíथक, व्यापारिक व न्यायिक सुधारणा
केल्या. १७७२ मध्ये वॉरन हेिस्टगने महसूल वसुलीचे ठोके
जास्त बोली लावणाऱ्याना १ वर्षांसाठी दिले. वॉरन हेिस्टगने
मीठ, सुपारी, तंबाखूव्यतिरिक्त व्यापारावर २.५% कर लावला. वॉरन हेिस्टगने कलकत्ता उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून
सर एलिहाज इम्पेची यांची नियुक्ती केली. नंदकुमार
खटला : १७७५ मधील नंदकुमार हत्या खटल्यात वॉरन हेिस्टगचा संबंध. रेग्युलेटीन अ‍ॅक्ट, १७७३ : यानुसार कलकत्ता
सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली. १७७८ मध्ये आशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना केली. वॉरन हेिस्टगने चार्ल्स विल्कीन्सद्वारे अनुवादित गीतेस प्रस्तावना लिहिली.
लॉर्ड कॉर्नवॉलिस (१७८६ ते १७९३) :
१७८६ मध्ये कॉर्नवॉलिस गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. न्यायालयीन सुधारणा : कॉर्नवॉलिसने सत्ता कलेक्टरांच्या हातात केंद्रित केली. १७८६ ला कलेक्टरांना दिवाणी न्यायाधीश म्हणून नियुक्त केले. १७९० मध्ये फौजदारी कायद्यात सुधारणा करण्यात आली. भारतीय न्यायाधीशांच्या हातातील जिल्हा फौजदारी न्यायालय समाप्त करण्यात आले. त्याजागी ५ फिरती न्यायालये सुरू करण्यात आली. प्रांतिक न्यायालयाची स्थापना कलकत्ता, मुíशदाबाद, ढाका, पटणा या ठिकाणी कॉर्नवॉलिसच्या काळात झाली. कॉर्नवॉलिस संहिता – अधिकार विभाजनाच्या तत्त्वावर कॉर्नवॉलिसची संहिता आधारित आहे. त्याने कर व न्यायपद्धती विभाजित केली. त्याने कलेक्टरकडेच पूर्वीचे न्यायालयीन व फौजदारी अधिकार होते ते काढून त्याकडे फक्त कर अधिकार शिल्लक ठेवले. जिल्हा सत्र न्यायालयात स्वतंत्र न्यायाधीश नेमणूक केली. भारतात त्याने कायद्यांच्या सर्वोच्चतेचा नियम लागू केला. कॉर्नवॉलिसची न्यायप्रणाली ही पाश्चिमात्य न्याय संकल्पना व समतेच्या तत्त्वांवर आधारित होती.
० पोलीस सुधारणा- त्याने पोलिसांना जास्त वेतन द्यावयाचे ठरवले. खुनी व्यक्ती व चोरांना पकडल्यास खास पुरस्कार जाहीर केला. जमीनदारांकडून पोलीस अधिकार काढून घेण्यात आले.
० कर सुधारणा – १७८७ मध्ये कॉर्नवॉलिसने प्रांतांना राजस्व भागात विभाजित केले. त्यावर कलेक्टरची नियुक्ती केली.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 13:43 ( 1 year ago) 5 Answer 3432 +22