भारत देश स्वतंत्र होऊन किती वर्ष झाली?www.marathihelp.com

आपल्या देशाला स्वतंत्र मिळवून 75 वर्ष पूर्ण झाली.

त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. आज आपल्याला इंग्रजांच्या जुलमी सत्तेपासून मुक्त होऊन 75 वर्ष पूर्ण होत आहेत. 15 ऑगस्ट हा दिवस आपल्या सर्व नागरिकांसाठी महत्वाचा दिवस आहे. कारण की हाच दिवस पाहण्यासाठी आपल्या देशातील अनेक वीरांनी आपले बलिदान दिले होते.

आणि त्यामुळेच इंग्रजांच्या अशा जुलमी धोरणामुळे इंग्रजाविरुद्ध अनेक क्रांतिकारी संघटना उभ्या राहिल्या. अनेकांनी शांतीच्या मार्गाने तर अनेकांनी शस्त्र उचलून इंग्रजांविरुध्द बंड पुकारले होते. अनेक लोकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वर्ष १८५७ रोजी झालेल्या उठावामध्ये अनेक क्रांतिकारकांनी आपला निषेध नोंदविला होता. त्यामध्ये तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई,नाना साहेब पेशवे यांनी हा 1857 चा उठाव पेटवून धरला होता. त्यानंतर अनेक क्रांतिकारकांनी सशस्त्र उठाव केला त्यामध्ये वासुदेव बलवंत फडके, भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, चाफेकर बंधू इत्यादी क्रांतिकारकांनी आपला निषेध नोंदविला होता. काही जणांनी इंग्रज अधिकाऱ्यांची हत्या केली. भारतीय माणूस स्वतंत्र मिळविण्यासाठी पेटून उठला पाहिजे यासाठी जनजागृती करण्यात आली. अनेक जणांनी आपली वृत्तपत्रे सुरू करून भारतीय लोकांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले. अशे अनेक प्रयत्ने झाली, पण ती दडपली सुध्दा गेली. न्या रानडे, टिळक, गोपाळ कृष्ण गोखले,आगरकर यांनी आपल्या लेखणी आणि आपल्या भाषण वाणीतून इंग्रजांकडून होणारा अन्याय इंग्रजांकडून होणारा जुलूम यांची जनतेला जाणीव करून देण्याचे कार्य त्यांनी केले. १५ ऑगस्ट या दिवशी आपण ज्या प्रमाणे आपल्या क्रांतिकारकांचे आभार मानतो. त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतो. त्याच प्रमाणे इतर दिवशी सुद्धा आपण आपल्या क्रांतिकारकांचा सन्मान केला पाहिजे. हे आपले भारताचा नागरिक म्हणून कर्तव्य आहे. या वर्षी आपल्या देशाला स्वतंत्र मिळवून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. आज आपल्याला इंग्रजांच्या जुलमी सत्तेपासून मुक्त होऊन 75 वर्ष पूर्ण होत आहेत. 15 ऑगस्ट हा दिवस आपल्या सर्व नागरिकांसाठी महत्वाचा दिवस आहे. कारण की हाच दिवस पाहण्यासाठी आपल्या देशातील अनेक वीरांनी आपले बलिदान दिले होते.

solved 5
General Knowledge Monday 10th Oct 2022 : 16:13 ( 1 year ago) 5 Answer 19 +22