बर्लिन कुठे आहे?www.marathihelp.com

बर्लिन कुठे आहे?

बर्लिन (जर्मन: Berlin) ही जर्मनी देशाची राजधानी व १६ राज्यांपैकी एक राज्य आहे. सुमारे ३४.७ लाख लोकसंख्या असलेले बर्लिन हे जर्मनीमधील सर्वात मोठे शहर आहे. बर्लिन शहर जर्मनीच्या ईशान्य भागात वसले असून ते बर्लिन-ब्रांडेनबुर्ग ह्या युरोपातील सर्वात मोठ्या महानगर क्षेत्राचे केंद्र आहे.

१२व्या शतकाच्या सुमारास स्थापन झालेल्या बर्लिनला युरोपाच्या इतिहासात विशेष स्थान आहे. आजवर बर्लिन ही प्रशियाच्या राजंत्राची (१७०१ - १९१८), जर्मन साम्राज्याची (१८७१ - १९१८), वाइमार प्रजासत्ताकाची (१९१९ - १९३३), नाझी जर्मनीची (१९३३ - १९४५) व आजच्या जर्मनी देशाची (१९९० - चालू) राजधानी राहिलेली आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये नाझी जर्मनीचा पराभव झाल्यानंतर बर्लिन शहराचे दोन तुकडे करण्यात आले. पूर्व बर्लिन हे पूर्व जर्मनीच्या राजधानीचे शहर तर पश्चिम बर्लिन हे पश्चिम जर्मनीच्या अधिपत्याखालील शहर हे दोन तुकडे बर्लिनच्या भिंतीने वेगळे करण्यात आले. १९९० साली जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर बर्लिनची भिंत पाडून टाकण्यात आली व बर्लिन शहर पुन्हा एकदा एकसंध झाले.

एक जागतिक शहर असलेले बर्लिन हे राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक दृष्ट्या युरोपामधील एक प्रमुख शहर आहे.

शहररचना
दुसऱ्या महायुद्धामध्ये बरेचसे बेचिराख झालेले शहर १९५० व १९६० च्या दशकांमध्ये नव्याने बांधण्यात आले. ऐतिहासिक काळापासून अनेक राजवटींचे मुख्य शहर असल्यामुळे बर्लिनमध्ये विविध कलाप्रकाराच्या इमारती आहेत.

इतिहास

बाराव्या शतकामध्ये स्थापन झालेले बर्लिन हे हान्से ह्या संघामधील एक प्रमुख शहर होते. इ.स. १७०१ मध्ये प्रशियाच्या राजतंत्राच्या निर्माणानंतर बर्लिन हे राजधानीचे शहर बनले.

भूगोल
बर्लिन शहर जर्मनीच्या ईशान्या भागात पोलंड देशाच्या सीमेच्या ८५ किमी पश्चिमेला स्प्री नदीच्या काठांवर वसले आहे. ब्रांडेनबुर्ग राज्याने बर्लिनला सर्व बाजूंनी वेढून टाकले आहे.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 12:28 ( 1 year ago) 5 Answer 6177 +22