प्रत्याभरण म्हणजे काय?www.marathihelp.com

प्रत्याभरण म्हणजे काय?
प्रत्याभरण : प्रत्येक पाठानंतर निरीक्षण श्रेणीतून प्राप्त माहितीनुसार प्रत्याभरण होत असते. त्यात प्रथम: सर्व निरीक्षणांची फळ्यावर नोंद; निरीक्षण भिन्नतेवर प्रथम चर्चा; अपेक्षित घटक त्याची वारंवारीता याकडे लक्ष वेधणे; कोणता घटक केंव्हा, कोठे, कसा आला याची चर्चा; न आलेल्या घटकांची पाठात येण्याच्या दृष्टिने चर्चा; त्यासाठी आवश्यक तेथे दिग्दर्शन, प्रत्याभरणानुसार पाठात दुरुस्ती इत्यादी बाबी महत्त्वाच्या असतात.

प्रत्याभरण व चिकित्सा सत्र : प्रशिक्षणार्थ्याचा पाठ प्रभावी झाला नसल्यास त्याला त्याच्या अध्यापनातील दोष, मर्यादा, उणिवा दाखविल्या जातात. पाठात कोणत्या ठिकाणी सुधारणा करणे गरजेचे आहे, ते सांगून त्याला पुन्हा प्रत्याभरणाची संधी दिली जाते. आवश्यकतेनुसार आदर्श अध्यापन पाठाची चित्रफीत दाखविली जाते.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 12:10 ( 1 year ago) 5 Answer 4956 +22