पृथ्वीची पूर्व पश्चिम व्यासाची लांबी किती?www.marathihelp.com

पृथ्वीची पूर्व पश्चिम व्यासाची लांबी ११०.५६८ किमी.
नकाशावर अक्षांश विषुववृत्ताला समांतर अशा पूर्व-पश्चिम वक्र रेषांनी (अक्षवृत्तांनी) दाखवितात आणि ते विषुववृत्तापासून उत्तरेस व दक्षिणेस ०० ते ९०० असे मोजतात. २३० २७' उत्तर अक्षवृत्ताला कर्कवृत्त, तर २३० २७' दक्षिण अक्षवृत्ताला मकरवृत्त म्हणतात; तसेच ६६० ३०' उत्तर अक्षवृत्ताला उत्तर ध्रुववृत्त तर ६६० ३०' दक्षिण अक्षवृत्ताला दक्षिण ध्रुववृत्त म्हणतात. विषुववृत्तापासून मकर व कर्क वृत्तांपर्यंतच्या प्रदेशाला उष्ण कटिबंध, त्यांच्या पुढील ध्रुववृत्तापर्यंतच्या भागांना समतीशोष्ण कटिबंध व तेथून पुढच्या ध्रुवापर्यंतच्या भागांना शीत कटिबंध म्हणतात.

एखाद्या स्थानाचे रेखांश म्हणजे त्या स्थानाचे मध्यान्हवृत्त व मध्यमंडल (मूळ रेखावृत्त) यांच्यातील क्षैतिज कोन होय; नकाशावर रेखांश दक्षिणोत्तर वक्र रेषांनी (रेखावृत्तांनी) दर्शवितात आणि ग्रिनिचचे रेखावृत्त (मूळ रेखावृत्त) शून्य मानून त्याच्या पूर्वेस व पश्चिमेस ०० पासून १८०० पर्यंत रेखावृत्ते मोजतात.

कृत्रिम उपग्रहांचे युग सुरू झाल्यावर पूर्वीप्रमाणे मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेस व पश्चिमेस १८०० पर्यंत रेखावृत्ते देण्याऐवजी ती मूळ रेखावृत्तापासून एकाच दिशेत म्हणजे पूर्वेकडे ३६०० पर्यंत दिली, तर सोयीचे होईल असे आढळून आले आहे आणि रेखावृत्तांची ही नवी पद्धती आता वापरात येऊ लागली आहे.

solved 5
General Knowledge Monday 10th Oct 2022 : 16:51 ( 1 year ago) 5 Answer 97 +22