पानगळीचा ऋतू म्हणजे काय?www.marathihelp.com

पानगळ ही वृक्षांच्या जीवनामधली एक अवस्था आहे. यामध्ये भरपूर पाने असलेल्या वृक्षाची पाने एखाद्या ठरावीक ऋतूमध्ये गळून जातात. जगाच्या निरनिराळ्या भागात हा कालावधी वेगवेगळा आढळून येतो. समशीतोष्ण प्रदेशात हा कालावधी शरद ऋतूचा असतो, तर उष्ण कटिबंधात हवामान शुष्क होण्याआधी पानगळ होते. पानगळीमुळे वनस्पतीमधील पानांद्वारे होणारे बाष्पीभवन थांबण्यास मदत होते.भारतात याला पानगळ असे म्हणातात आणि या ऋतूला शिशिर ऋतू असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 13:40 ( 1 year ago) 5 Answer 3385 +22