पर्यावरण म्हणजे काय थोडक्यात स्पष्ट करा?www.marathihelp.com

पर्यावरण म्हणजे काय थोडक्यात स्पष्ट करा?

पर्यावरण म्हणजे आपला परिसर . जमीन , आकाश व पाणी हे पर्यावरणाचे प्रमख घटक आहेत तर यामधील जैविक व अजैविक घटक मिळून परिसर अर्थात पर्यावरण तयार होते .

जैविक घटकामध्ये आपण म्हणजे मानव , सर्व प्रकारचे जीव , वनस्पती , झुडपे यांचा समावेश आहे.

तर अजैविक घटकामध्ये हवा , आकाश , हवेतील सर्व वायू , सूर्य किरणे , प्रकाश , सर्व प्रकारचे रासायनिक मूलद्रवे इत्यादी येतात. या सर्व घटकाचा उपयोग करून जीव सृष्टी जीवित राहते . म्हणूनच पर्यावरण सुरक्षित तर मानव सुरक्षित हे आपणास आता पटले आहे.

आपले पाण्याचे साठे ज्यात महासागर , समुद्र , नद्या , तळी , पाण्यातील जीव सृष्टी , पाण्यातील रसायनाचे घटक , त्याचे साठे , आकाश , सूर्य , चंद्र , सूर्यकिरणे , सूर्य ऊर्जा , तसेच आकाशातील इतर ग्रह , जमिनीवरील उंच ,लहान पर्वत , मोठं -मोठी वाळवंट , वोल्कॅनो , डोंगरातील द-या , हे सारे पर्यावर्णाचे घटक आहेत .

पाण्यातील जिवाणू , विविध प्लवक , मासे व इतर सर्व जीव सृष्टी , समुद्रातील सूक्ष्म शेवळापासून ते महाकाय सस्तन सागरी प्राणी , विविध प्रकारचे पाण्यातील शेवाळ ,जंगलातील सर्व वन्य जीव , सर्व वृक्ष सृष्टी, गवताळ प्रदेश, पक्षी जग , डोंगरातील जीव सृष्टी हे सर्व ही पर्यावरणातील जैविक घटक आहेत .

पर्यावरणातील प्रत्येक जैविक घटक पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी जबाबदार आहे , जमिनीवर सर्व प्रकारची वनस्पती यामध्ये झाडे , झुडपं , पिकं , फळाची झाडे अन्न निर्मिती , ऊर्जा उत्पन्न करतात म्हणून यांना उत्पादक म्हणतात ज्यावर मानवासहित सर्व इतर जीव सृष्टी जिवंत आहे . तर पाण्यात सूक्ष्म शेवाळ , हरित द्रव्य असलेले प्लवक , इतर मोठे शेवाळ अन्न निर्मिती करतात ज्यावर अन्न साखळी मुळे सर्व पाण्यातील जीव सृष्टी जगते.

मनुष्य म्हणजे आपण पर्यावरणात खूप बदल केले . मानवाने नद्यांवर मोठी धरण बांधून पिण्या, शेती , उद्योगासाठी पाण्याची सोय केली , शहरी करण , शेती ,रस्ते , इत्यादी साठी खूप जंगल तोड केली . सुमद्रात भराव टाकून समुद्राचे खूप क्षेत्र उदयोग ,इमारती बांधण्यासाठी केला.

आपण पर्यावरणात बदल करून जे काही केले त्यामुळे आपली प्रगतीझाली पण त्याबरोबर मानवाने पर्यावरणासाठी काही केले नाही , त्याची काळजी घेतली नाही . इत्यादींमुळे आज जगात हवामान बदलामुळे आपण हतबल होत चाललो आहोत . समुद्रातील पाण्याची आम्लता वाढू लागल्याने सागरातील जीवसृष्टी नाहीशी होऊ शकते. नवनवीन रोगांचे संक्रमण होत असून त्यावर उपाय सापडत नाही अशी आपली आजची स्थिती आहे.

पर्यावरणात केलेल्या बदलाचे परिणाम आता मानवास दिसू लागल्याने जगभर पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी माणूस खडबडून जागा झाला आहे .

solved 5
पर्यावरण Tuesday 6th Dec 2022 : 11:42 ( 1 year ago) 5 Answer 4896 +22