ज्वारीचे शास्त्रीय नाव काय?www.marathihelp.com

एक महत्त्वाचे तृणधान्य. ज्वारी ही वनस्पती गवताच्या पोएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सो. र्घम बायकलर आहे.

एक महत्त्वाचे तृणधान्य. ज्वारी ही वनस्पती गवताच्या पोएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सो.र्घम बायकलर आहे. गहू, मका या वनस्पतीही याच कुलातील आहेत. सो. बायकलर प्रजातीत अनेक रानटी जाती असून केवळ सो. ही केवळ लागवडीखाली आहे. ही वनस्पती मूळची उत्तर आफ्रिकेतील असून जगभरातील उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेशांत मोठ्या प्रमाणावर तिची लागवड केली जाते. हे पीक वर्षायू असले तरी तिचे काही वाण बहुवर्षायू आहेत. भारतात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांत ज्वारीची व्यापारी स्तरावर लागवड करण्यात येते.

ज्वारीचे खोड सु. ४ मी.पर्यंत उंच वाढते. त्याच्या पेरांवर एकाआड एक, साधी, ६० – १०५ सेंमी. लांब मोठी पाने असतात. पानांची रुंदी ३ – ४ सेंमी. असून टोकाला निमुळती होत गेलेली असतात. फुलोरा (कणिश) अग्रभागी, ५ – ९ सेंमी. लांब व असंख्य व्दिलिंगी फुलांचा असतो. फुले गवताच्या कुलातील फुलांसारखी असून दलपुंज आणि निदलपुंज असा फरक नसतो. फळ धान्य प्रकारचे, एकबीजी व ३-४ मिमी. आकाराचे असून त्याचा रंग शुभ्र पांढरा ते गडद लाल असतो.

ज्वारीची सो. बायकलर जाती कोरडया मातीत वाढू शकते आणि दुष्काळासारख्या कठीण परिस्थितीतही तग धरू शकते. या पिकाला ताण सहन करण्याची क्षमता पुढील बाबींमुळे आली आहे : (१) मुळांचा विस्तार आणि पानांचा पृष्ठभाग यांचे गुणोत्तर जास्त आहे. (२) पाण्याच्या टंचाईच्या काळात ज्वारीची पाने गुंडाळून घेऊन बाष्पोत्सर्जनाचे प्रमाण घटवतात. (३) दुष्काळात हे पीक दीर्घकाळ विश्रांती घेते, मरत नाही. (४) पानांवरील मेणाच्या आवरणामुळे वनस्पती सुरक्षित राहते.

भारतात पिकांच्या लागवडीखालील क्षेत्राच्या उपलब्ध आकडेवारीनुसार तांदूळ आणि गहू यांच्या खालोखाल ज्वारीचा क्रम लागतो. मुख्यतः धान्य म्हणून ज्वारीचे पीक घेतले जाते. ज्वारीच्या पिठापासून भाकरी करतात. तसेच दाण्यांचा उपयोग अल्कोहॉल तयार करण्यासाठी केला जातो. गोड ज्वारीपासून रस काढतात. खोड व पाने जनावरांना खाऊ घालतात. मात्र, ज्वारीच्या कोवळ्या दाण्यांमध्ये ऱ्हायड्रोजन सायनाइड असल्यामुळे ते जनावरांना खाऊ घालत नाहीत. ज्वारीच्या काही जातींत फुलोऱ्यापासून झाडू तयार करतात.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 16:05 ( 1 year ago) 5 Answer 4428 +22