ग्राहक हा बाजारपेठेचा कोण आहे?www.marathihelp.com

ग्राहक :

ग्राहक असा आहे जो पुनर्विक्री किंवा व्यावसायिक हेतूसाठी नाही तर वापरासाठी वस्तू खरेदी करतो. ग्राहक एक अशी व्यक्ती आहे जी वस्तू आणि सेवा वापरण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंसाठी काही प्रमाणात पैसे देते. यामुळे, भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या आर्थिक व्यवस्थेत ग्राहकांची महत्त्वपूर्ण भूमिका असते.

15 मार्च हा दिवस संपूर्ण जगात ‘जागतिक ग्राहक दिन’ म्हणून साजरा होत असतो.


ग्राहकांचे हक्क – ग्राहकांना पुढील हक्क मान्य करण्यात आले आहे.

1) सुरक्षिततेचा हक्क – ज्या वस्तुपासून जीविताला धोका आहे, अशा वस्तू बाजारात विकण्यापासून संरक्षण मिळण्याचा ग्राहकाला हक्क आहे.

2) माहिती मिळण्याचा हक्क – मालाचा दर्जा, परिणाम, शुध्दता, किंमत इ. बाबत पूर्ण माहिती मिळण्याचा ग्राहकाला हक्क आहे.

3) निवड करण्याचा हक्क – बाजारात असलेल्या विविध वस्तूंमधून हवी असलेली वस्तू निवडण्याचा ग्राहकाला हक्क आहे.

4) बाजू ऐकून घेतली जाण्याचा हक्क – ग्राहकहिताचा विचार करणार्‍या विविध व्यासपीठावर प्रतिनिधित्व करण्याचा व त्याचे म्हणणे ऐकून घेण्याचा ग्राहकाला हक्क आहे.

5) तक्रार निवारण्याचा हक्क – ग्राहक म्हणून मिळणारे संरक्षण, त्याबद्दलचे कायदे व इतर माहिती मिळवण्याचा, त्या विषयात कौशल्य संपादन करण्याचा ग्राहकाला पूर्ण अधिकार आहे.

6) ग्राहक शिक्षणाचा हक्क – ग्राहक म्हणून मिळणारे संरक्षण, त्याबद्दलचे फायदे व इतर माहिती मिळवण्याचा, त्या विषयात कौशल्य संपादन करण्याचा ग्राहकाला पूर्ण अधिकार आहे. ग्राहकांनी स्वत: जागृत होऊन आपल्यासाठी असलेल्या कायदेशीर योजनांचा लाभ घेतला पाहिजे, हे मात्र निश्चित!

solved 5
General Knowledge Tuesday 13th Dec 2022 : 09:47 ( 1 year ago) 5 Answer 7990 +22