क्रिप्टोकरन्सीमध्ये ब्लॉकचेन म्हणजे काय?www.marathihelp.com

क्रिप्टोकरन्सीमध्ये ब्लॉकचेन म्हणजे काय?

क्रिप्टोकरन्सीसाठी ब्लॉकचेन हे तंत्रज्ञान वापरलं जातं. ब्लॉकचेन म्हणजे सोप्या भाषेत Chain of Blocks - किंवा रेकॉर्ड्सची लिस्ट. ज्यामध्ये विविध स्वरूपाची माहिती मोठ्या प्रमाणात - रियल टाईममध्ये साठवली जाते. आणि प्रत्येक साखळीचा आपल्या आधीच्या साखळीतल्या माहितीशी संबंध असतो.

ब्लॉकचेन हे एक डिजिटल लेजर आहे ज्याद्वारे रेकॉर्ड सुरक्षित ठेवले जातात. ब्लॉकचेन तंत्रज्ञानामध्ये अनेक ब्लॉक असतात आणि त्यात डेटा असतो आणि ते एकमेकांशी जोडलेले असतात.

यामध्ये सर्व प्रकारचे व्यवहार डिजिटल पद्धतीने नोंदविले जाते ते अत्यंत सुरक्षित आणि गोपनीय आहेत.

यामध्ये असलेला डेटा हा एका ठिकाणी न स्टोर करता थोडा थोडा सर्व जगभर इंटरनेट वर स्टोर केला जातो ब्लॉकचैन ही एक गुंतागुंतीची तांत्रीक प्रक्रिया आहे असे आपण म्हणू शकतो.

ब्लॉकचेन ही एक असंख्य ब्लॉक्सची एक साखळी आहे. सर्व डाटाची विशिष्ट साठवण क्षमता असलेल्या प्रत्येक ब्लॉकमध्ये हजारो व्यवहार नोंदवलेले असतील.

दोन ब्लॉक्स हे हॅशने जोडलेली असतील. हा हॅश म्हणजे तर गुंतागुंतीच्या गणितांचा एक कोड असेल. एखाद्याला माहिती हॅक पण करायची असेल तर या हॅशची गुंतागुंतीची ही सर्व गणिते किंवा कोड सोडवावा लागेल, जे खूपच कठीण अशक्य काम आहे.

जर एक ब्लॉक हॅक झाला तरी हे तर अशक्य असं काम आहे तो फक्त डेटा चा एक भाग आहे बाकी डेटा अनेक ब्लॉक्स मध्ये स्टोर असेल. म्हणजे या technology ला पूर्ण पने हॅक करणे शक्य नाही.

केवळ एवढेच नाही तर विशिष्ट एका ब्लॉकमधील विशिष्ट एका व्यवहारापर्यंत जाण्यासाठी असे अनेक हॅश डिकोड करावे लागतील, जे जवळपास अशक्यच काम आहे नाही का.

त्यामुळे हे व्यवहार पूर्णपणे सुरक्षित राहणार असल्याचा दावा केला जात आहे आणि ते सुरक्षित सुद्धा आहे. या प्रत्येक ब्लॉकमध्ये यूजरचे व्यवहार Digital रुपात साठवलेले असतात, जे त्या साखळीतील सर्वांना पाहता येणे हे शक्य होते.




क्रिप्टोकरन्सीची वैशिष्ट्ये –

क्रिप्टोकरन्सी हा डिजिटल मालमत्तेचा एक प्रकार आहे
हे विकेंद्रीकरणावर आधारित आहे, याचा अर्थ असा आहे की ते कोणत्याही एका व्यक्तीद्वारे नियंत्रित नाही, म्हणजेच ते कोणत्याही एका व्यक्तीद्वारे नियंत्रित केले जात नाही.
क्रिप्टोकरन्सीची देवाणघेवाण करता येते
हे व्हर्च्युअल करन्सी आहे म्हणजेच ते फक्त ऑनलाइन उपलब्ध आहे
त्यात पारदर्शकता आहे कारण त्याचा बहुतेक कोड ओपन सोर्स आहे





प्रसिद्ध क्रिप्टोकरेंसी कोणत्या आहेत –
Bitcoin (BTC) Price: $68,515
Ethereum (ETH) Price: $4,850
Binance Coin (BNB) Price: $650.69
Cardano (ADA) Price: $2.26
Solana (SOL) Price: $245.71
Tether (USDT) Price: $1.00
XRP (XRP) Price: $1.33
Polkadot (DOT) Price: $51.20

solved 5
General Knowledge Tuesday 13th Dec 2022 : 14:02 ( 1 year ago) 5 Answer 8258 +22