कौशल्य शिक्षण म्हणजे काय?www.marathihelp.com

कौशल्य शिक्षण म्हणजे काय?

कौशल्य ज्ञान अभ्यासक्रमात अंतर्गुणवत्ता, रोजगाराच्या ठिकाणी सातत्याने ओळख, उद्योगक्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन, प्रात्यक्षिके या सर्व गोष्टींचा समावेश केलेला असतो. त्यामुळे कौशल्यज्ञान शिक्षण घेतलेले विद्यार्थी त्यांच्या समकक्ष विद्यार्थ्यांपेक्षा अधिक उत्तम व चांगल्याप्रकारे तयार झालेले असतात.


सध्याच्या प्रचलित शिक्षण पद्धतीने रोजगार कौशल्य नसलेले अनेक सुशिक्षित तरुण निर्माण केले. याचे प्रमुख कारण म्हणजे शैक्षणिक संस्था व शिक्षक यांना उद्योगक्षेत्रात आवश्‍यक असलेल्या अचूक गरजा ओळखता आल्या नाहीत. महाविद्यालये व विद्यापीठे जे अभ्यासकम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतात, ती खरी अडचण आहे. सध्याच्या काळात उपलब्ध असलेले रोजगार व भविष्यकाळात विविध उद्योग - व्यवसायात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी, याचे वेळोवेळी व पद्धतशीरपणे सर्वेक्षण होत नाही. महाविद्यालये व विद्यापीठ यांचा विविध कंपन्यांशी असलेला सहयोग हा प्रामुख्याने विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणे, याच उद्देशाने केलेला असतो. कंपनी प्रतिनिधींना महाविद्यालये आणि विद्यापीठातील अंतर्गत शैक्षणिक परिषद (अॅकॅडमिक कौन्सिल) आणि अभ्यासमंडळ याविषयी माहिती असते. विद्यापीठातील सर्वच विभागांनी उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञांशी सातत्याने संवाद साधणे गरजेचे आहे.

प्रशिक्षण कालावधी :

याचा परिणाम म्हणजे, कोणत्या प्रकारचे रोजगार भविष्यकाळात येतील आणि उद्योगक्षेत्रात कोणत्या व्यवसायांना मागणी आहे, याची विद्यापीठांना अजिबात माहिती नसते. यामुळे महाविद्यालये व विद्यापीठांनी चालवलेले अभ्यासक्रम नोकरीसाठी व उद्योगक्षेत्रातील आवश्यक असणाऱ्या भूमिकेशी साधर्म्य साधणारे नसतात; तसेच अभ्यासक्रम, अभ्यासक्रमाचा कालावधी आणि त्या शिक्षणामुळे झालेला वैयक्तिक विकास, उद्योगक्षेत्रात असलेल्या वेगवेगळ्या रोजगाराच्या संधींशी व आवश्यक ज्ञानाशी परस्परपूरक नसतात. याचा सर्वतोपरी परिणाम म्हणजे विद्यार्थ्याने मिळवलेली पदवी उद्योगक्षेत्रातील गरजेशी पूर्णत: वेगळी असते; शिवाय असे विद्यार्थी जेव्हा नोकरी करू लागतात, तेव्हा त्यांना प्रदीर्घ काळापर्यंत प्रशिक्षण घ्यावे लागते. अनेकदा विद्यार्थ्यांनी स्वीकारलेली नोकरी त्यांनी मिळवलेल्या शिक्षणाशी, घेतलेल्या ज्ञानाशी व माहितीशी विसंगत असते. कालांतराने अशा नोकरीबद्दल मनात अनास्था, नावड निर्माण होते व आपल्या योग्यतेचे काम नाही, असे वाटू लागते.


कौशल्य विकास शिक्षण महत्त्वाचे का आहे?

कौशल्य ज्ञानाचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, कौशल्य व वैयक्तिक क्षमता निर्माण करणे आणि त्यासाठी तीन बाबी महत्त्वाच्या आहेत.

१. विविध उद्योगक्षेत्रात अनेक रोजगार संधी आणि भविष्यकाळात निर्माण होणाऱ्या रोजगारसंधी.

२. कौशल्य ज्ञानावरील अभ्यासकम, त्यांचा कालावधी आणि उद्योगक्षेत्रातील गरजा ओळखून त्या आधारावर तयार केलेले दैनंदिन व्यावहारिक प्रशिक्षण.

३. विद्यार्थ्यांना सुरुवातीला विशिष्ट प्रकारच्या रोजगाराची आणि त्यानुसार उपलब्ध असलेल्या अपेक्षित अभ्यासकमाची निवड.

जे विद्यार्थी कौशल्य ज्ञानावर आधारित असलेले अभ्यासक्रम निवडतात, त्यांना अभ्यासक्रमाविषयी संपूर्ण माहिती असते; शिवाय रोजगाराच्या ठिकाणी त्यांच्याकडून काय विशिष्ट अपेक्षा व गरजा आहेत, याविषयी त्यांना सखोल ज्ञान असते. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या कालावधीत ज्ञान, विविध कौशल्ये आणि स्पर्धात्मक गुणवत्ता विद्यार्थ्याच्या अंगी बाणवली जाते. कौशल्य ज्ञान अभ्यासक्रमात अंतर्गुणवत्ता, रोजगाराच्या ठिकाणी सातत्याने ओळख, उद्योगक्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन, प्रात्यक्षिके या सर्व गोष्टींचा समावेश केलेला असतो. त्यामुळे कौशल्यज्ञान शिक्षण घेतलेले विद्यार्थी त्यांच्या समकक्ष विद्यार्थ्यांपेक्षा अधिक उत्तम व चांगल्याप्रकारे तयार झालेले असतात. अशा विद्यार्थ्यांना रोजगाराच्या ठिकाणी किंवा उद्योगक्षेत्रात वेळोवेळी अनुभव मिळाला असल्याने, रोजगाराच्या संधी अधिक उपलब्ध असतात. सिम्बायोसिस कौशल्य विद्यापीठांमार्फत विविध अभ्यासक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना उच्चवाढ क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या रोजगारांच्या संधीनुरूप आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाते.

solved 5
शिक्षात्मक Tuesday 6th Dec 2022 : 13:57 ( 1 year ago) 5 Answer 5143 +22