इंग्लडमध्ये औद्योगिक क्रांती का झाली ते स्पष्ट करा?www.marathihelp.com

इंग्लडमध्ये औद्योगिक क्रांती का झाली ते स्पष्ट करा?

इंग्लंडमध्ये प्रथम सुरू झालेल्या आणि नंतर सर्व युरोपभर पसरलेल्या उत्पादन साधने व प्रक्रियांत झालेल्या बदलाला औद्योगिक क्रांती असे म्हणतात. सर्वसाधारणपणे इ.स. १७५० ते इ.स. १८५० असा शतकभराचा कालखंड या क्रांतीच्या पहिल्या टप्प्याने व्यापला होता. औद्योगिक क्रांती म्हणजे हस्त उद्योगाकडून यांत्रिक उत्पादनाकडे झालेले संक्रमण होय अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात बाष्प शक्ती आणि जनशक्ती यांचा उपयोग करून उत्पादनाच्या प्रक्रियेत यंत्रांचा उपयोग करण्यास युरोपमध्ये सुरुवात झाली औद्योगिक क्रांती घडून येण्यासाठी भांडवलशाहीचा विकास होणे आवश्यक होते वस्तूच्या किंमती कमी ठेवणे श्रमाचा मोबदला कमी देणे अधिक नफा मिळविणे अशी या भांडवलशाही व्यवस्थेची वैशिष्ट्ये होती.

व्यापारी क्रांतीमुळे व्यापाराचा विस्तार होऊन व्यापारिवर्ग श्रीमंत झाला. या प्रक्रियेला त्या काळात दक्षिण अमेरिकेतून करण्यात आलेल्या मौल्यवान धातूंच्या आयातीनेही मोठा हातभार लावला. या आयातीमुळे संबंधित देशांत वस्तूंचे भाव वाढले, पण आनुषंगिक खर्चात त्या मानाने वाढ न झाल्यामुळे व्यापारिवर्गाचा फायदा अतोनात वाढला. व्यापारिवर्गाचे महत्त्व जसजसे वाढत गेले, तसतसे सरंजामशाही अर्थव्यवस्थेचे दिवस भरत गेले. अर्थात ही प्रक्रिया सर्वत्र एकसारखेपणाने व सुकरतेने तडीस गेली, असे मात्र नाही. काही देशांत सरंजामशाही सत्ताधार्यां नी व्यापारावर नियंत्रणे बसविण्याचा व व्यापारातील फायद्यावर आपला दावा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. अशा देशांत व्यापारिवर्गाला सरंजामशाही अर्थव्यवस्थेच्या पुरस्कर्त्यांशी झगडा द्यावा लागला. फ्रान्समध्ये हे घडले. अशा प्रकारच्या झगड्यांत शेवटी व्यापारिवर्गाचा विजय झाला. इंग्लंडमध्ये व्यापारिवर्गाला फार मोठा संघर्ष न करता आणि इतर देशांच्या तुलनेने लवकर आर्थिक स्थान व महत्त्व प्राप्त झाले. स्थूलमानाने १६४१–५१ या दशकात इंग्लंडमध्ये व्यापारिवर्ग प्रभावी होत गेला आणि या वर्गाच्या हितसंबंधांच्या दृष्टीने आर्थिक धोरणे ठरत गेल्यामुळे तेव्हापासून व्यापारी व औद्योगिक क्षेत्रांत इंग्लंडचे श्रेष्ठत्व प्रस्थापित होत गेले. व्यापाराला ग्रेट ब्रिटनने आपल्या उद्योगधंद्यांचे पाठबळही प्राप्त करून दिले. अंतर्गत उद्योगांवर बाह्य व्यापाराचा परिणाम पूरकच होईल, अशी दक्षता ग्रेट ब्रिटनने नेहमीच घेतली. व्यापारी क्रांतीमुळे ग्रेट बिटनमध्ये प्रथम व्यापारी भांडवलशाहीचा व नंतर औद्योगिक भांडवलशाहीचा पाया घातला गेला.

इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून येण्यासाठी अनुकूल पार्श्वभूमी तयार झालेली होती त्याठिकाणी लोखंड व कोळशाचे साठे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते दमट हवामानामुळे सुती कापड उद्योग याठिकाणी भरभराटीला आलेला होता इंग्लंडच्या ताब्यात वसाहतींचा मोठा प्रदेश उपलब्ध होता उत्पादनासाठी लागणारा कच्चामाल आयात करणे इंग्लंडला सहज शक्य झाले त्यानंतर मालवर प्रक्रिया करून पक्क्या स्वरूपात इंग्लंडच्या ताब्यातील वसाहतीत विकणे सुलभ झाले मिळणाऱ्या नफ्यातून मोठ्या प्रमाणात अतिरिक्त भांडवल उपलब्ध झाले या सर्व पार्श्वभूमीवर इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली या औद्योगिक क्रांतीचे भारतावर दूरगामी परिणाम झाले घरगुती उद्योगांचा ह्रास झाला भारतातील कापड उद्योग मंदावला सरकारचे आर्थिक धोरण भारतापेक्षा इंग्लंडच्या हिताचे झाले रेल्वे वापरात आल्यामुळे युरोपियन राष्ट्रांचा माल भारतात खेडोपाडी नेणे सोपे झाले यातून भारताचे आर्थिक शोषण सुरू झाले.

पहिल्या औद्योगिक क्रांतीचा ब्रिटनमधून यूरोपीय देशांत प्रसार झाला किंवा यूरोपातून जगातील इतर देशांत झाला; या प्रक्रियेला काही वेळा ‘दुसरी औद्योगिक क्रांती’ ही संज्ञा वापरली गेली. तर काही वेळा, बाष्पशक्तीची जागा विद्युत्‌शक्तीने घेणे ह्यांसारख्या विकासाच्या नवनव्या अवस्थाही ह्या संज्ञेन दर्शविल्या गेल्या. औद्योगिक क्रांती ह्या संज्ञेचा वापर करण्यात अचूकतेची समस्या उद्‍भवते, कारण अंतर्ज्वलन एंजिन किंवा अणुशक्ती किंवा संगणक ह्यांचा वापर अनुक्रमे तिसरी, चौथी किंवा पाचवी औद्योगिक क्रांती सुचवितो. सर्वसाधारणतः हल्ली औद्योगिक क्रांती ही संज्ञा ग्रेट ब्रिटनमधील यंत्रनिर्मितीच्या सुरुवा तीच्या अवस्थेस लावतात किंवा इतर देशांत जेव्हा हस्तव्यवसाय व त्यांवर आधारित समाजव्यवस्था ही यंत्रोत्पादनाच्या अवस्थेपुढे लुप्त झाली ,त्या अवस्थेला लावतात .याचमुळे भारतात औद्योगिक क्रांती येत आहे ,असे बोलले जाते .औद्योगिक क्रांती ही घडत आहे व ती चालूच राहणार आहे .सध्या औद्योगिक क्रांती म्हणून जे काही घडत आहे ते,‘स्वयंचलन’,‘संक्रांतिविज्ञान’(सायबरनेटिक्स)अशा विविध संज्ञांनी संबोधिले जात आहे.

व्यापारी क्रांतीचे परिणाम : जलदगतीने, सुरक्षित व नियमित होणारी रेल्वे वाहतूक, वाफेवर चालणारी जहाजे यांमुळे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेची जागा जागतिक अर्थव्यवस्थेने घेतली. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे परावलंबित्व वाढले आणि काही देशांमध्ये शत्रुत्वही निर्माण झाले. वाहतुकीच्या यांत्रिकीकरणामुळे अनेक देशांचे महत्त्व वाढले. अमेरिकेबरोबरच आशिया व आफ्रिका खंडांतील अनेक देश जागतिक अर्थव्यवस्थेच्या प्रक्रियेत सहभागी झाले. ग्रेट ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादित वस्तूंची वाहतूक होऊ लागली. जहाजबांधणी उद्योगालाही चालना मिळाली. यांत्रिक वाहतूक व दळणवळणाची वेगवान साधने यांमुळे ब्रिटिशांना अनेक देशांत वसाहती स्थापन करणे शक्य झाले. या वसाहतींमधून कारखान्यासाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध झाला आणि वसाहतींच्या रूपाने तयार मालाला मोठ्या बाजारपेठा मिळू लागल्या. पूर्वी लहानसहान वस्तूंचा व्यापार होत असे त्याची जागा कोळसा, यंत्रसामग्री, खाद्यपदार्थ व कच्च्या मालाने घेतली. व्यापारातील स्पर्धेची तीव्रता कमी करण्यासाठी संयुक्तीकरणाचे (कॉंबिनेशन) उपक्रम करावे लागले. नवीन अर्थनीती उदयाला येऊन गुंतवणुकीच्या नवीन व विस्तारित संधी निर्माण झाल्या. दळणवळणाच्या साधनांच्या सुलभतेमुळे नवीन व्यापारी संघटना उदयाला आल्या आणि दुसरी व्यापारी क्रांती यशस्वी झाली.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 11:11 ( 1 year ago) 5 Answer 6968 +22