आदिवासी विकास म्हणजे काय?www.marathihelp.com

आदिवासींना केंद्रस्थानी ठेवणारा दृष्टिकोन म्हणून आदिवासी विकासाची संकल्पना करण्यात आली आहे. आदिवासी लोक भारतभर विखुरलेले आहेत. त्यांची स्वतःची संस्कृती आणि परंपरा आहे.आदिवासी विकासासाठी राज्यसंस्थेने अनेक पुढाकार नोंदवले आहेत. यामध्ये शैक्षणिक विकास, सामाजिक आणि राजकीय विकास करण्याचा प्रयत्न झाला आहे. १९९९मध्ये आदिवासी व्यवहार मंत्रालय स्थापन करण्यात आले. तसेच, राज्य घटनेच्या कलम २७५ (२) अंतर्गत अनुसूचित जमातींच्या विकासासाठी विशेष केंद्रीय सहायता निधी पुरविण्यात येतो.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:55 ( 1 year ago) 5 Answer 69809 +22