असामान्य वर्तन म्हणजे काय?www.marathihelp.com

असामान्य मानसशास्त्र : सर्वसाधारणत: न आढळणारे ते ‘असाधारण’ या सदरात टाकले जाते. परंतु या व्यापक सदरामध्ये कर्तृत्वप्रधान असामान्यत्व ( ⇨लोकोत्तर बुद्धिमत्ता, प्रतिमा तसेच लोकोत्तर व प्रभावशाली चारित्र्यगुण ), त्याचप्रामाणे विकृतिदर्शक असामान्य या दोहोंचाही समावेश होऊ शकतो. विकृति -दर्शक असामान्यत्वास ‘अपसामान्य’ अशी संज्ञा देता येते. अपसामान्य मानसशास्त्रात विकृतींचा अथवा विक्रियारूप प्रतिक्रियांचा अभ्यास करण्यात येतो म्हणून त्यास ‘विकृतिमानसशास्त्र’ अशीही संज्ञा वापरली जाते. विकृतींचे वर्गीकरण, प्रत्येक विकृतिप्रकाराची लक्षणे, विकृतींची सर्वसाधारण कारणमीमांसा, याचप्रमाणे प्रकारश: कारणमीमांसा, विकृतींचा परिहार करण्यासाठी योजले जाणारे उपाय अथवा चिकित्सांचे प्रकार, त्यांची युक्तायुक्तता, या बाबींचे विवेचन करणे हे अपसामान्य मानसशास्त्राचे प्रधान उद्दिष्ट आहे. या विवेचनाच्या अनुषंगाने निद्रा, स्वप्ने, दिवास्वप्ने, संमोहित अवस्था इ. सामान्य व असामान्य यांच्या सीमारेषेवरील प्रकारांचाही परामर्श हे शास्त्र घेते. शास्त्ररचनेसाठी आवश्यक ती सामग्री मिळविण्याच्या, विकृतींचे निकष ठरवण्याच्या, विकृतींची कारणमीमांसा करण्याच्या, तसेच विकृतिचिकित्सा (उपचार) करण्याच्या निमित्ताने सामान्य मानसशास्त्र, बालमानसशास्त्र, समाजशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र, शिक्षणक्षेत्र, कायदा, वैद्यकशास्त्र, मनोविश्लेषण वगैरेंशी अपसामान्य मानसशास्त्राचा संबंध येतो.

solved 5
General Knowledge Saturday 15th Oct 2022 : 08:58 ( 1 year ago) 5 Answer 931 +22