अमेरिकेत राष्ट्रप्रमुख आणि शासन प्रमुख कोण असतो?www.marathihelp.com

अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा अमेरिका देशाचा राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुख आहे.
राष्ट्राध्यक्ष अमेरिकेच्या सरकारचा विशेष पदाधिकारी व सैन्यप्रमुख आहे.

अमेरिकन संविधानाच्या दुसऱ्या कलमाने राष्ट्राध्यक्षाला अनेक महत्त्वपूर्ण अधिकार दिले आहेत. संघीय सरकारामधील अनेक उच्च पदांची नियुक्ती (सेनेटच्या संमतीनंतर), काँग्रेसने मान्य केलेले निर्णय व कायदे न पटल्यास नकाराधिकार, गुन्हेगारांना माफी इत्यादी काही अधिकार राष्ट्राध्यक्ष वापरतो. तसेच देशाची परराष्ट्रधोरणे ठरवणे ही राष्ट्राध्यक्षाची जबाबदारी आहे. सर्वमान्यपणे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जगामधील सर्वात बलाढ्य व महत्त्वपूर्ण व्यक्ती मानला जातो. वॉशिंग्टन, डी.सी. ह्या अमेरिकेच्या राजधानीमधील व्हाइट हाउस हे राष्ट्राध्यक्षाचे अधिकृत कार्यालय व निवासस्थान आहे.

राष्ट्राध्यक्ष दर चार वर्षांनी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमधून निवडला जातो. एक व्यक्ती कमाल दोन वेळा (कमाल ८ वर्षे कार्यकाळ) राष्ट्राध्यक्षपदी राहू शकते. जानेवारी २०२१ मध्ये सत्तेवर आलेले जो बायडन हे विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहेत.

solved 5
General Knowledge Thursday 20th Oct 2022 : 13:17 ( 1 year ago) 5 Answer 1720 +22